आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Brazil Airlines Flight Womens Fight Viral Video; Brazil Gol Airlines Flight | Fight For Window Seat | Brazil

विमानात विंडो सीटवरून महिला भिडल्या:झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महिला विमानात हाणामारी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ ब्राझिलच्या जीओएल एअरलाईन्सच्या विमानातला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकांच्या झिंज्या उपटत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित विमान सलवादोरवरून साओ पाओलोकडे जात होते. यावेळी एका महिलेने आपल्या अंपग मुलासाठी एका दुसऱ्या महिलेला सीट बदली करुन घेण्यासाठी विनंती केली. पण त्या महिलेने नकार दिल्यानंतर दोघींमध्ये भांडण सुरू झाले.

ब्राझिलच्या जीओएल एअरलाईन्सच्या विमानात ही घटना घडली. एअरलाईन्सकडून भांडण करणाऱ्या सर्व प्रवाशांचा विमान प्रवास रद्द करण्यात आला.
ब्राझिलच्या जीओएल एअरलाईन्सच्या विमानात ही घटना घडली. एअरलाईन्सकडून भांडण करणाऱ्या सर्व प्रवाशांचा विमान प्रवास रद्द करण्यात आला.

दोन महिलांमधील सुरुवातीचा शाब्दिक वाद हाणामारीवर गेला आणि दोन्ही कुटुंब भांडणात उतरले. दोन्ही महिलांनी एकमेकांच्या झिंज्या धरुन फ्री-स्टाईल हाणामारी केली. या भांडणात एका महिलेचा टॉपही निसटला. तेव्हा तीने हाताने अंग झाकण्याचा प्रयत्न केला. या भांडणामुळे विमानाला दोन तास उशीर झाल्याचे विमानातील क्रु मेंम्बरने सांगितले.

क्रु मेंम्बरने सांगितले की, मी दरवाजे बंद करत होतो. तेव्हा 20 नंबरच्या रो दोन महिला एकमेकांसोबत भांडण करत होत्या. महिला प्रवासी जोरजोरात ओरडत होत्या. एकमेकांच्या कानशिलात लगावत होत्या. मी लगेच ते भांडण सोडवण्यासाठी धावलो. एका कुटुंबात 5 तर दुसऱ्या कुटुंबात 10 सदस्य होते. दोन्ही कुटुंब एकमेंकावर ओरडत होते, मारहाण करत होते. अखेर दोन तासानंतर आम्ही परिस्थितीवर नियत्रंण मिळवले. एअरलाईन्सकडून भांडण करणाऱ्या सर्व प्रवाशांचा विमान प्रवास रद्द करण्यात आला.

मद्यपीस विमानातून उतरवले जाऊ शकते

मद्यधुंद अवस्थेतील एखाद्या प्रवाशाला एखादी विमान कंपनी विमानातून उतरवू शकते का? किंवा त्याने गोंधळ घातल्यास, प्रवाशाने क्रू सदस्यासह गैरवर्तन केल्यास काय होईल?विमानात दारू प्यायल्यास एअरलाइन्स प्रवाशांना प्रवास करण्यापासून रोखू शकते का, विमान प्रवासात प्रवाशांच्या वागणुकीबाबत काय नियम आहेत हे दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेणार आहोत. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...