आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Brazil Corona Outbreak: In One Day 4 Thousand Patients Are Died; 80 Thousand Are Found; News And Live Updates

कोरोना महामारी:ब्राझील आता अनियंत्रित अणुकेंद्रासारखेच - तज्ञ; देशात लॉकडाऊन मुळीच नाही; बोलसोनारो ठाम

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझील : सावो पावलो येथील एका स्पोर्ट जिमच्या रुग्णालयातील स्थिती. रुग्णालयांत खाटा शिल्लक राहिलेल्या नाहीत. तात्पुरत्या रुग्णालयातही उपचारासाठी जागा नाही.
  • ब्राझीलमध्ये चोवीस तासांत 4 हजारांहून जास्त मृत्यू, 80 हजारांवर रुग्ण

ब्राझीलमध्ये बुधवारी गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ४ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, पेरूने एका दिवसात चार हजार मृत्यू पाहिले आहेत. ब्राझीलमध्ये एकूण मृत्यूसंख्याही ३.३७ लाखावर गेली आहे. ही संख्या अमेरिकेतील मृत्यूच्या आकड्याहून जास्त आहे. ब्राझीलमध्ये दररोज ८० हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात खाटा शिल्लक राहिलेल्या नाहीत. उपचाराच्या प्रतीक्षेत रुग्ण मृत्युशय्येवर दिसून येत आहेत. ड्यूक विद्यापीठाचे प्रोफेसर व ब्राझीलचे डॉक्टर मिगुएल निकोलेलिस म्हणाले, ब्राझील एखाद्या अणुकेंद्रासारखा झालाय. कारण, ब्राझीलमध्ये चेन रिअॅक्शन पाहायला मिळते. त्यातही ही प्रक्रिया अनियंत्रित झाली आहे. ब्राझील बायोलॉजिकल फुकुशिमा झाला आहे, असे तज्ञांना वाटते. ही भयंकर स्थिती असतानाही देशाचे पंतप्रधान बोलसोनारो कोणत्याही स्वरूपाच्या लॉकडाऊनला विरोध करत आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊ शकते. विषाणूमुळे होणाऱ्या हानीपेक्षा ते जास्त असेल, असे बोलसोनारो यांनी म्हटले आहे. परंतु त्यांच्या कोरोना हाताळण्याच्या पद्धतीवर टीका होत आहे.

युरोप : नियमांचे पालन, चुका सुधारल्याने युरोपात रुग्णसंख्या निम्म्याहून कमी
युरोपातील आघाडीच्या देशांत दररोज नवीन रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन, पोलंडसह ब्रिटनमध्ये गेल्या एक आठवड्यात दररोज नव्या रुग्णांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. फ्रान्समध्ये ६ एप्रिलला ८०५४ रुग्ण आढळून आले. फ्रान्समध्ये ५० हजारांवर रुग्ण मिळाले होते. ९० टक्क्यांहून जास्त आयसीयूची सुविधा आता मिळत नाही. कारण, तेथे क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणूनच येथे चार आठवड्यांचा लॉकडाऊन लागू झाला. आता तीन दिवसांपासून नव्या रुग्णसंख्येत पाचपटीने घट दिसून येत आहे. ब्रिटनमध्ये वेगवान लसीकरण व नियमांचे काटेकोर पालन केल्याने नवे रुग्ण २ हजारांवर आले. युरोपातील बहुतांश देशांनी नाताळला सर्व नियम शिथिल केले होते. म्हणून नवी लाट आली. ही चूक ईस्टरला सुधारण्यात आली. त्या दिवशी व्यवहार बंद होते. युरोपात गेल्या वर्षी अतिशय भयंकर चित्र पाहायला मिळत होते. परंतु आता सुधारणा दिसून येत आहे. प्रशासनाबरोबर जनतेनेही त्यात सहकार्य केले.

जग : १ एप्रिलपासून नव्या रुग्णांत घट होती, आता पुन्हा दररोज ६ लाखांवर
जगभरात नव्या रुग्णसंख्येत १ एप्रिलनंतर घट होत होती, परंतु बुधवारी त्यात पुन्हा वाढ झाली. ६ एप्रिलला जगभरात ६ लाखांहून जास्त रुग्ण आढळून आले. त्यात १ लाख भारतातील आहेत. जगभरात आतापर्यंत १३.३० काेटींहून जास्त लोक बाधित आहेत. २८.८६ लाख रुग्णांचा मृत्यू झाला.

ब्रिटन : पुढील आठवड्यापासून अनलॉकचा नवा टप्पा सुरू
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुढील आठवड्यापासून अनलॉकचा दुसरा टप्पा सुरू होईल, असे जाहीर केले. देशाने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यासाठी सर्व चार चाचण्या पूर्ण केल्या आहेत. दररोजच्या नव्या रुग्णसंख्येत घट होऊन ती सरासरी २ हजारांवर आली आहे. सोबतच ४० टक्क्यांहून जास्त लोकसंख्येचे लसीकरण झाले.

तज्ञांचा इशारा : ब्राझीलमध्ये १ जुलैपर्यंत ५ लाखांवर मृत्यू शक्य ब्राझीलमध्ये महामारी रिस्पॉन्स टीमचे समन्वयक डॉ. निकोलेलिस म्हणाले, कोरोना महामारी ब्राझीलच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठे संकट ठरले आहे. एका विश्लेषणानुसार १ जुलैपर्यंत देशात ५ लाखांवर मृत्यू होऊ शकतात. परंतु मृत्युदर असाच १० टक्के राहिल्यास मृत्यू ६ लाखांच्या घरात पोहोचतील, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील तज्ञांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...