आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुहेरी संकट:ब्राझील : संरक्षणमंत्री, सैन्य, नौदल,हवाई दल प्रमुखांनीही सोडले पद, कोरोना काळातील नाकर्तेपणा, बोलसोनारोंना विरोध वाढला

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परराष्ट्रमंत्र्यांनी सोमवारीच दिला होता राजीनामा

ब्राझीलमध्ये कोरोना महामारीमुळे होत असलेल्या हानीसोबतच राजकीय संकटही उभे ठाकले आहे. संरक्षणमंत्र्यांसह लष्कर, नौदल व हवाई दलप्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आले. कोरोनाची स्थिती हाताळण्यात यश न आल्यामुळे पंतप्रधान बोलसोनारो यांच्या विरोधात असंतोष धुमसत आहे. तो आता आणखी वाढला. जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये होत आहेत. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याची जनतेची भावना आहे. त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. तिनही सैन्य दलांचे प्रमुख पंतप्रधानांशी असहमत होते. परराष्ट्रमंत्र्यांनीदेखील सोमवारी पदाचा राजीनामा दिला होता.

अमेरिकेत नवे रुग्ण ६० हजारांहून जास्त, मृत्यूंत घट
अमेरिकेत बुधवारी गेल्या २४ तासांत ६२ हजार ४५९ नवे रुग्ण आढळले. दररोजच्या रुग्णसंख्येत ५० हजारांहून जास्त एवढी भर पडली. परंतु मृत्यूंचे प्रमाण मात्र घटले आहे. बुधवारी ८७३ मृत्यू झाले.

ऑस्ट्रेलिया उद्दिष्टापासून ८५ टक्के मागे
ऑस्ट्रेलियाने ३१ मार्चपर्यंत ४० लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु आतापर्यंत ३४ लाख डोस कमी पडले आहेत. म्हणजेच उद्दिष्टापासून ८५ टक्के मागे आहे. सरकारच्या नाकर्तेपणावर टीका केली जात आहे.

फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन शक्य
फ्रान्समध्ये सातत्याने नवे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी येथे ५ हजारांहून जास्त रुग्ण आयसीयूमध्ये होते. एप्रिलनंतरची ही सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे देशात नवा लॉकडाऊन लागू होऊ शकतो.

ब्राझीलमध्ये ३० मार्चला ३७८० मृत्यू, एका दिवसात सर्वाधिक
ब्राझीलमध्ये मंगळवारी ३ हजार ८० जणांचा मृत्यू झाला होता. एकाच दिवसातील हा मोठा आकडा होय. ८६,७०४ नवे रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ३.१७ लाख जणांना प्राण गमवावे लागले. रुग्णालयात उपचारासाठी खाटा शिल्लक राहिलेल्या नाहीत. लोक खुर्चीवर बसून उपचार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...