आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Brazil Has The Highest Number Of Epidemics At 97,586; Patients Are Growing Rapidly In France World Covid News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना महामारी:ब्राझीलमध्ये महामारीचे सर्वाधिक 97,586 रुग्ण आढळल्याने चिंता; फ्रान्समध्ये वेगाने वाढताहेत रुग्ण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना महामारीमुळे ब्राझीलमध्ये पंतप्रधानांचा निषेध करताना निदर्शक.

जगात कोरोना महामारीमुळे सर्वात वाईट स्थिती ब्राझीलची आहे. शुक्रवारी येथे गेल्या चोवीस तासांत विक्रमी ९७,५८६ रुग्ण आढळून आले. यादरम्यान २६३९ जणांचा मृत्यू झाला. ब्राझीलमधील बाधितांची ही आजवरची सर्वात मोठी संख्या ठरली आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलला काेरोनाचा जास्त फटका बसला आहे. याबाबतीत भारताचा क्रमांक तिसरा लागतो. ब्राझीलमध्ये सात दिवसांत ५.३७ लाख नवे रुग्ण आढळून आले. युरोपीय देशांतील परिस्थिती देखील चिंताजनक आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारी गेल्या चोवीस तासांत ४५, ६४१ रुग्ण आढळून आले.

फ्रान्समध्ये नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सुरूवातीच्या लाटेसारखे आहे. येथील मृतांचा आकडा ९३ हजाराच्या घरात गेला आहे. पाेलंडमध्येही शुक्रवारी ३४ हजारांहून जास्त रुग्ण आढळले. जर्मनी, इटली, तुर्कीमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. कोरोनाचा वेग पाहता जर्मनीसह बहुतांश युरोपीय देशांनी ईस्टरच्या दिवशी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. गेल्या चोवीस तासांत जगभरात ६.२२ लाख लोकांना कोरोनाची पुष्टी झाली आहे. या दरम्यान १० हजारांहून जास्त जणांनी प्राण गमावले.

बातम्या आणखी आहेत...