आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश ब्राझीलमध्ये पोलीस आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला. समर्थक पोलिस मुख्यालयात घुसले. बोल्सोनारोंच्या समर्थकांनी 'लुला दा सिल्वा' यांच्या विजयाचा निषेध करत अनेक वाहने पेटवून दिली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काही आंदोलकांनी पोलिस ठाण्यावर देखील दगडफेक केली आहे.
खरं तर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत लुला दा सिल्वा यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचा 21 लाख 39 हजार मतांनी पराभव केला होता. बोल्सोनारो यांनी आधीच स्पष्ट केले होते की, जर ते निवडणूक हरले तर ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गाचा अवलंब करतील आणि निकाल स्वीकारणार नाहीत.
केव्हा सुरू झाली हिंसा, जाणून घेऊया सविस्तर
31 ऑक्टोबरपासून ब्राझीलमध्ये छोटी निदर्शने होत आहेत. सोमवारी 12 डिसेंबर रोजी ब्राझीलच्या सर्वोच्च निवडणूक न्यायालयाने अधिकृतपणे लुलाचा विजय घोषित केला. यानंतर बोल्सोनारोच्या समर्थकांनी विरोध सुरू केला. जसजसा हिंसाचार वाढत गेला, तसतसे सुप्रीम कोर्टाने समर्थक जोसे अकासिओ सेरेरे झवांटे यांना अटक करण्याचे आदेश दिले, परंतु हिंसा कमी होण्याऐवजी वाढली. मंगळवार, 13 डिसेंबर रोजी बोल्सोनारोच्या समर्थकांनी पोलिस मुख्यालयात प्रवेश केला. येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अनेक बस आणि वाहने जाळण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
आता पाहा हिंसाचाराशी संबंधित छायाचित्रे...
ब्राझिलियाची राजधानी युद्ध क्षेत्र बनले
हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओ शेअर करताना पत्रकार अॅलन रिओसने लिहिले की, राजधानी ब्रासिलिया युद्धक्षेत्रासारखी दिसते. येथे वाहने जाळण्यात आली. काही इमारतींची तोडफोडही करण्यात आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी पिवळे टी-शर्ट घातले होते. बोल्सोनारो यांच्या पक्षाच्या समर्थनाचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते.
चालत्या बसला आग लावली
काही स्थानिक पत्रकारांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आंदोलकांनी चालत्या बसला आग लावल्याचे दिसून येते. मात्र, या बसमध्ये किती लोक होते आणि आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती मिळालेली नाही.
निवडणुकीच्या निर्णयानंतर देशात निदर्शने झाली.
बोल्सोनारोच्या पराभवानंतर देशातील अनेक भागात निदर्शने झाली. त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला. फेडरल हायवे पोलिस (पीआरएफ) चे कार्यकारी संचालक मार्को टोनियो टेरिटो डी बॅरोसो म्हणाले होते - आंदोलकांनी 267 रस्ते रोखले. देशातील सर्वात मोठ्या विमानतळाकडे जाण्याचा मार्गही बंद करण्यात आला होता, त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. लोक 'लुला नं' असे बॅनर घेऊन निषेध करत होते.
बोलसोनारोच्या समर्थकांनी रस्ते अडवले. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटल हिलमध्ये हिसांचार झाला होता
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटविण्यासाठी अराजकता आणि भ्रष्टाचाराचा मार्ग निवडला. यूएस मध्ये, 6 जानेवारी 2021 रोजी, कॅपिटल हिल (यूएस संसद) वर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला. कॅपिटल हिल दंगलीत 138 पोलीस जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ५ हून अधिक हल्लेखोर ठार झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.