आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्राझीलची साहसी करिना ओलियानी यांनी दोरीच्या मदतीने इथिओपियातील उकळता लाव्हा आेलांडला. इथिओपियाच्या अफार प्रांतात एर्टा आले नावाचा ज्वालामुखी आहे. हा उकळता लाव्हा सतत वाहत असताे. येथे लाव्हाचा तलाव बनला आहे. जगातील सर्वाधिक तापमान या सरोवराच्या सभाेवताली असते. याला पृथ्वीचा सर्वात उष्ण भागदेखील म्हणतात. एर्टा अले ज्वालामुखीवर एक विशेष प्रकारचा दाेरखंड लावण्यात आला होता. यानंतर करीना ओलियानीने विशेष सूट, हेल्मेट, ऑक्सिजन सिलिंडर लावून हा लाव्हा तलाव आेलांडला.
उकळत्या लाव्हारसावरून तिने ३२९ फूट ११.७ इंचाचे अंतर पार केले. करिना आेलियानी हे अंतर पार करत असताना तेथील तपमान १,१८७ अंश सेल्सियस हाेते. या कामगिरीनंतर करीना ओलियानीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव काेरले. करिना ओलियानी आज डॉक्टर आहेत. तसेच, कोरोना रुग्णांची सेवा करणारी एक आघाडीची योद्धा आहे. त्याच्याकडे दोन डॉक्टरेट प्रमाणपत्र आहेत करिना आेलियानीकडे हेलिकाॅप्टर उडवण्याचा आणि पायलट प्रशिक्षण देण्याचा परवाना देखील आहे. जगाच्या कानाकाेपऱ्यात काेठेही आपली माेहीम पूर्ण करतानाच ती लाेकांवर उपचारही करते.कधीकधी ती दुर्गम भागातही लोकांना मदत करण्यासाठी जाते. करिना आेलियानीबराेबर तिची पिटाया फिल्मस ही प्राेडक्शन टीमही बराेबर असते.
वयाच्या १७ व्या वर्षी वेकबाेर्ड चॅम्पियन बनली...
करिना आेलियानी १२ वर्षांची असताना तिने पहिल्यांदा स्कूबा डायव्हिंगचा क्लास लावला हाेता. त्यानंतर काही पाेहण्याशी संबंधित काही खास प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर ती त्यानंतर ते समुद्रातील सर्वात मोठे शिकारी म्हणजे शार्क आणि व्हेल माशांबराेबर पाेहली. सह पोहले. वयाच्या १७ व्या वर्षी ती ब्राझीलची वेकबाेर्ड चॅम्पियन बनली. तीन वेळा स्नोबोर्डिंग चॅम्पियन बनली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.