आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट कायम:अमेरिकेत शाळा उघडताच मुलांच्या कोरोना संसर्गाचे जुने विक्रम मोडीत, महामारीचा वेगाने फैलाव

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत शाळा सुरू हाेताच एकूण संसर्गापैकी बाधितांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील माेठ्या प्रमाणात शाळा असलेला जिल्हा न्यूयाॅर्कमध्ये पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या आहेत. ही अनेक माता-पित्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बाब आहे. परंतु यातून पालकांना दहशतही वाटू लागली आहे. अलीकडे तरुणांत संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. २ सप्टेंबरपर्यंत एकूण बाधितांपैकी एक चतुर्थांश एवढे मुलांचे प्रमाण आहे. देशात शाळेला सुरुवात हाेताच शाळकरी मुलांत संसर्ग वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. वास्तविक न्यूयाॅर्कमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वात नंतर घेण्यात आला. अमेरिकेतील दुसरा सर्वात माेठा शालेय जिल्हा म्हणून लाॅस एंजलिसची आेळख आहे. चार आठवड्यांपूर्वी येथे शाळा पूर्ववत झाली आहे. मे महिन्यात कॅलिफोर्नियातील मारिन कौंटीमध्ये लसीकरण नसलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकामुळे डझनावर विद्यार्थ्यांना संसर्ग झाला. शाळांमध्ये कोविड-१९ चे नियम राज्य निश्चित करतात. अनेक रुढीवादी राज्य शाळांत मास्क घालण्यास प्रतिबंध करतात. अमेरिकेत १० पेक्षा जास्त राज्यांत शाळांत मास्क अनिवार्य आहेत.

ब्रिटन : हिवाळी याेजना, व्हॅक्सिन पासपाेर्ट सेवा, बूस्टर डाेस सुरू हाेणार
ब्रिटनने हिवाळ्यात काेराेनाशी लढाई करण्यासाठी याेजना जारी केली आहे. नाइट क्लब, म्युझिक व्हेन्यू, बिझनेस काॅन्फरन्स, फुटबाॅल स्टेडियम इत्यादीमध्ये व्हॅक्सिन पासपाेर्ट सेवा पुन्हा सुरू झाली आहे. म्हणजेच लसीकरण झालेल्यांनाच अशा प्रकारच्या आयाेजनात प्रवेश िमळेल. साेबतच मास्कलाही अनिवार्य करण्यात आले आहे. साेबतच लाेकांना खाेलीत पुरेशी हवा खेळती राहील अशी व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ५० हून जास्त वयाच्या लाेकांसाठी बूस्टर डाेसची सुरुवात केली जाणार आहे. साेबतच तपासणी, परीक्षण कार्यक्रमही सुरू ठेवला जाणार आहे.

सिंगापूर : ८० टक्के लसीकरणानंतरही वर्षानंतर संसर्गात वाढ, लाॅकडाऊन वाढले
सिंगापूरमध्ये एका दिवसात विक्रमी ८३७ नवे रुग्ण आढळले. संसर्गाचा हा आकडा वर्षातील सर्वात माेठा आहे. खरे तर देशात ८० टक्के लाेकसंख्येचे लसीकरण झाले आहे तरीही संसर्ग वाढत आहे. वाढता संसर्ग लक्षात घेऊन सरकारने लाॅकडाऊन रद्द करण्याची याेजना टाळली आहे. मंगळवारी ८०९ लाेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात ७५ लाेक गंभीर आजारी आहेत. ते आॅक्सिजनवर आहेत. ९ जणांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. गंभीर रुग्णांचे वय सरासरी ६६ वर्षांहून जास्त आहे. २८ दिवसांत बाधितांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला. आॅक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या दाेन दिवसांत दुप्पट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...