आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bring Home The Boy Or Girl Of The Desired Feature |future Picture Shown By The Veteran AI Expert Of Riton

आभासी मुले:हव्या त्या वैशिष्ट्याचा मुलगा वा मुलगी घरी आणा, प्रेमाने गोंजारा, नंतर परत करा; तज्ज्ञाने दाखवले भविष्यातील चित्र

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न केले नाही, मात्र मूल तर हवे आहे! पत्नीलाही मूल हवे आहे, मात्र गर्भधारणेतील कष्ट नकोत! मूल असावे, मोठे व्हावे, प्रेम करावे... मात्र या महागाईत वेगळा खर्च नको. अशा आशयाची वाक्ये कुणाच्या तोंडून ऐकल्यास लोक चक्रावून जातील. मात्र, आगामी काळात त्याबाबत आश्चर्य वाटणार नाही. स्पष्ट सांगायचे झाल्यास, विविध वैशिष्ट्यांचे मूल हवे असल्यास मिळेल. त्यासाठी एकरकमी पैसे मोजावे लागतील किंवा भाड्यानेही गरज भागेल. तुम्हाला वाटत असेल हा प्रकार रोबोचा असेल, मात्र हा समज चुकीचा आहे. हे सर्व मेटा म्हणजे आभासी जगात शक्य असेल.

मात्र, त्याचे स्वरूप वास्तवासारखे असेल. बिहेवियरल इंटरेक्शनच्या क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ कॅट्रिअना कॅम्पबेल यांनी आपले पुस्तक ‘एआय बाय डिझाइन : ए प्लॅन फॉर लिव्हिंग विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मध्ये हा आराखडा सादर केला आहे. त्यांनी सांगितले की, येत्या ५० वर्षांत एआय अशी वैविध्यपूर्ण मुलं आणेल, प्रत्येक जण त्यास आपलं असल्यासारखा स्वीकार करेल. मूल ज्या वातावरणात राहील, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) तसे ते करेल. थ्रीडी फिलिंगच्या माध्यमातून आलिंगन देतील. आनंदातही आनंदी आणि वेदना झाल्यावर दु:खाची भावनाही दाखवतील.

२००१ मध्ये एक्सपिरियन्स डिझाइनच्या क्षेत्रात मोठा प्रयोग करून सेरेनसारखी कंपनी स्थापणाऱ्या कॅम्पबेल म्हणाल्या, तमोगोची किड्स उच्च कोटीची असतील की वास्तव जगातील मुले आणि त्यांच्यातील अंतर असेल.

सतत ऑन-ऑफ केल्यास भावनात्मक संबंध नाही
भलेही भावना असतील, मात्र तमागोची किड्स तुमच्या इच्छेवरच लाइव्ह राहतील. तुम्ही त्यांना ऑर्डर देऊन बनवाल. मनाला वाटल्यास घरी आणा आणि नंतर परतही करू शकाल. मात्र, वारंवार त्यांना ऑफ-ऑन करत राहिल्यास भावनात्मक संबंध राहणार नाही आणि उपयोगीताही संपेल.

बातम्या आणखी आहेत...