आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा संकट:ब्रिटन : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने घबराट, लंडनमध्ये वर्दळीवर कडक बंदी शक्य

लंडन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका : लस घेताना लोकप्रतिनिधी सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी - Divya Marathi
अमेरिका : लस घेताना लोकप्रतिनिधी सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी
  • विषाणूचा नवा स्ट्रेन आधीच्या तुलनेने जास्त घातक, दक्षिण भागात बाधा

फायझरच्या लसीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याने लवकरच कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवता येईल, असे गणित ब्रिटनने मांडले असावे. परंतु कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. त्यामुळे घबराटीची स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक घेऊन त्यावर चर्चा केली आहे. विषाणूचे हे नवे स्ट्रेन गूढ आहे. लंडन व इंग्लंडच्या दक्षिणेकडील भागात ते आढळून आले. म्हणूनच पंतप्रधान जॉन्सन लंडनहून प्रवासावर बंदी आणण्याच्या विचारात आहेत. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनला व्हीयूआय-२०२०१२/१ असे नाव देण्यात आले आहे. हा स्ट्रेन पहिल्या स्ट्रेनच्या तुलनेत जास्त वेगाने महामारीचा विस्तार करत असल्याचे मानले जाते. केंट कौंटी लंडनमध्येही नवे रुग्ण वाढत आहेत. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले, सुरुवातीच्या तपासणीनुसार सुमारे ६० स्थानिक अधिकाऱ्यांनी नव्या स्ट्रेनची बाधा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

फायझर मॉडर्ना : गंभीर लक्षणे राेखण्यात सक्षम
अमेरिकेने महामारीविराेधातील लढाईसाठी फायझर व माॅडर्नाच्या लसींना आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे. दाेन्ही लसी एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहेत आणि तितक्याच प्रभावी. दाेन्ही उपलब्ध झाल्यास कुणाला प्राधान्य द्यावे, हा प्रश्न निर्माण हाेताे. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

1 काेणती लस आजाराला चांगल्या पद्धतीने राेखते?
फायझर व माॅडर्ना या दाेन्ही लसी काेविड-१९ ला राेखण्यात प्रभावी आहेत. दाेन्ही लसींचे उद्दिष्ट कफ, ताप, श्वासाेच्छ‌्वासात त्रास इत्यादी लक्षणांना राेखणे असा हाेता. परीक्षणात दाेन्ही लसी यशस्वी ठरल्या.

2 परीक्षणात लस घेतलेल्या किती जणांना काेराेना झाला?
फायझरच्या अखेरच्या टप्प्यात १८,१०० लाेकांना डाेस दिले गेले. त्यापैकी केवळ ८ जणांना काेराेना झाला. माॅडर्नाच्या परीक्षणात १३,९०० लाेकांना डाेस दिले हाेते. त्यापैकी केवळ ११ जणांना काेराेना झाला.

3 लसीमुळे काेणत्या प्रकारचे साइड इफेक्ट हाेताहेत?
दाेन्हीही लसी खूप सुरक्षित सांगण्यात आल्या. मात्र गंभीर अॅलर्जीचा सामना करणाऱ्या लाेकांनी फायझरची लस घेऊ नये, असा सल्ला ब्रिटनने दिला आहे. माॅडर्नाच्या साइड इफेक्टची प्रकरणे समाेर आलेली नाहीत.

नव्या वर्षात रेड झोन
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या इटलीने नाताळ व नव्या वर्षाच्या निमित्ताने नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत तीन वेगवेगळ्या टप्प्यांत लॉकडाऊन लागू होईल. पहिला टप्पा २४ डिसेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत, दुसरा ३१ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत चालेल. ५ व ६ जानेवारीला तिसरा टप्पा असेल.

आता कडक लॉकडाऊन
नाताळचा विचार करून ब्रिटन सरकार निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याच्या प्रयत्नात होते. २३ ते २७ डिसेंबरच्या कालावधीत लोकांना सण साजरा करण्याची परवानगी मिळणार होती. ख्रिसमस बबलमध्ये तीन कुटुंबे मिळून सण साजरा करतात. परंतु नव्या स्ट्रेनमुळे आता देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...