आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:जगात ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळताहेत, तरीही पूर्णपणे अनलॉक, मास्कची सक्तीही मागे

ब्रिटनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

किट्टी डोनाल्डसन आणि टिम रॉसब्रिटन सोमवारी पूर्णपणे अनलॉक झाला. तेही तेथे जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत असताना. ब्रिटनमध्ये रविवारी ४८ हजार, तर शनिवारी ५४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. देशात ८७ टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस, तर ६८ टक्क्यांना दोन्ही डोस दिल्याने तिसऱ्या लाटेत ब्रिटनला हा आत्मविश्वास आहे. विशेष म्हणजे ६.७० कोटी लोकसंख्येच्या ब्रिटनमध्ये ५४ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे आणि देशात कायदेशीरदृष्ट्या मास्क घालणेही आवश्यक नाही. दुसरीकडे लॉकडाऊन प्रतिबंधात मिळालेल्या सवलतीला फ्रीडम- डे म्हटले जात आहे.

पंधरा महिन्यांनंतर कोणत्याही प्रतिबंधांशिवाय पूर्ण रात्र उघडे असलेल्या बहुतांश नाइटक्लबमध्ये मोठी गर्दी झाली होती. बहुतांश नाइटक्लब व बारच्या बाहेर लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी लोकांना दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागली. गेल्या वर्षी मार्चमध्ये लावलेल्या प्रतिबंधांमुळे सोमवारी पहिल्यांदा लोकांनी प्रतिबंधांशिवाय पार्टीची मजा घेतली. क्लबमध्ये येणाऱ्या ७३ टक्के लोकांचे म्हणणे होते की, देश आताच लॉकडाऊनमधून निघाल्याने त्यांना परत जायचे नाही. ब्रिटनच्या बार आणि नाइटक्लबशी संबंधित लोकांचे म्हणणे होते की, जर असेच सुरू राहिले तर १५ महिन्यांत झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर होईल. त्यांना याचीच प्रतीक्षा होती.

इंडोनेशिया : २७ कोटी लोकसंख्या, संसर्गाचा हॉटस्पॉट
इंडोनेशिया सध्या जगात कोरोना संसर्गाचा मोठा हॉटस्पॉट झाला आहे. २७ कोटी लोकसंख्येच्या या देशात रोज ४४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत आणि शेकडो मृत्यू होत आहेत. इंडोनेशियातील रुग्णालयात जागा शिल्लक नाही. स्मशान अपुरे पडत आहेत. देशात आतापर्यंत सुमारे ६ टक्के लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे.

अमेरिकेतही डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव, रोज ७०% रुग्ण वाढले
अमेरिकेत रविवारी कोरोनाचे ९५१३ नवे रुग्ण आढळले. येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या संचालक रोशेल वॉलेन्स्की यांनी सांगितले, एका आठवड्यात देशात रोजच्या रुग्णात ७०% वाढ झाली आहे.

नवे संकट... ब्रिटनमध्ये नोरो विषाणूचे १५४ रुग्ण
पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) नुसार ब्रिटनमध्ये आतापर्यंत नोरो विषाणूचे १५४ रुग्ण आढळले आहेत. ब्रिटिश सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार, बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणारी व्यक्तीही बाधित होऊ शकते. उलटी, चक्कर येणे व पोटदुखी त्याची लक्षणे आहेत. आतड्यात व पेटात सूज येते व जळजळ होऊ शकते. संसर्गानंतर १२ ते ४८ तासांत लक्षणे दिसतात. ही लक्षणे १ ते ३ दिवस राहतात. पीएचईनुसार योग्य पद्धतीने हात धुऊनच ते रोखता येतात.

बातम्या आणखी आहेत...