आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:आराेग्यमंत्र्यांना ऑगस्टपर्यंत रोज एक लाख नव्या रुग्णांची भीती

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये लवकरच रोज एक लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळू शकतात. ब्रिटनचे नवे आरोग्यमंत्री साजिद जावेद यांनी हा दावा केला. सध्या रोज २७ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. मॅट हॅनकॉक यांच्या राजीनाम्यानंतर ते १० दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री झाले. जावेद यांनी सांगितले की, नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे उन्हाळ्यात (जुलै, ऑगस्ट) ब्रिटनमध्ये कोरोनाची स्थिती वाईट होऊ शकते. पंतप्रधान जॉन्सन देशात १९ जुलैपासून अनलॉकच्या तयारीत असतानाच जावेद यांनी हे वक्तव्य केले आहे. भविष्यात काही प्रतिबंध पुन्हा लागू करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

इटली : लस घेण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांचा नकार
इटलीत शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला आहे. यावरून आरोग्य विभागाने त्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. याविरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभाग प्रशासनावर खटला दाखल केला आहे. उत्तर आणि मध्य इटलीत असे खटले झाले आहेत.

अमेरिका : अवैध स्थलांतरित केंद्रांत लसीकरण कमी
अमेरिकेच्या अवैध स्थलांतरित ताबा केंद्रांत कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. अधिकाऱ्यांनुसार या केंद्रांवर मोजक्याच लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत येथे आणलेल्या अवैध स्थलांतरितांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या आठवड्यापासून येथे २६ हजार अवैध स्थलांतरित आहेत. एप्रिलमध्ये १४ हजार होते.

बातम्या आणखी आहेत...