आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटन:लॉकडाऊनचे नियम आणखी कडक होणे शक्य, एका दिवसात 57 हजार रुग्ण

ब्रिटन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी येथे ५७ हजारांहून जास्त रुग्ण समोर आले. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सोमवारी नव्या बाधितांची एका दिवसातील संख्या जास्तीत जास्त आढळून आली.

जॉन्सन म्हणाले, आगामी आठवड्यात शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ शकते. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३.५० लाखांवर पोहोचली आहे. शनिवारी अमेरिकेत २.९१ लाख रुग्ण समोर आहे. २ हजार ३७३ जणांनी प्राण गमावले.

मलेशिया व इराणमधील स्थितीत सुधारणा झाली आहे. मलेशियाने महामारीच्या स्थितीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. रविवारी मलेशियात १ हजार ७०४ रुग्ण आढळून आले. तेथे गेल्या तीन दिवसांत २ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले होते. इराणमध्ये रविवारी ५ हजार ९६० नवे रुग्ण समोर आले. गेल्या सात दिवसांतील ही सरासरी संख्या आहे. त्यामुळे ब्रिटनची यंत्रणा हादरली आहे.

आफ्रिकेकडे जास्त पर्याय नाही
दक्षिण आफ्रिकेतील सरकारच्या म्हणण्यानुसार आफ्रिका खंडांतील देशांकडे लसीसाठी जास्त पर्याय नाहीत. फायझरने दक्षिण आफ्रिकेला ५ कोटी डोस देऊ असे आश्वासन दिले आहे. परंतु ही लस खूप महाग आहे आणि ती वर्षाखेरीस उपलब्ध होईल. मॉडर्नासोबत काही करार झालेला नाही. ऑक्सफर्डची लसही २०२२ च्या आधी मिळणार नाही.

जर्मनीतही लवकरच कडक नियम
युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनीत कोरोनाशी संबंधित नियम १० जानेवारीनंतरही सुरू राहतील. लॉकडाऊनमुळे अनेक प्रमुख शहरांत दुकाने, रेस्तराँ, मनोरंजन उद्याने इत्यादी बंद आहेत. शाळा, डे-केअर सेंटरही बंद केले जाऊ शकतात. जर्मनीत रविवारी १०,८०७ नवे रुग्ण समोर आले. ३४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...