आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनापीडित देशांत सामील ब्रिटनमध्ये दररोजच्या नव्या रुग्णांचे प्रमाण ३ हजारांहून कमी झाले आहे. मृत्यूतही निम्म्यांहून जास्त घट झाली आहे. इतर देशांसाठी हा काेरोना नियंत्रणाचा जणू वस्तुपाठ ठरलाय. ब्रिटनमध्ये जानेवारीच्या उच्चांकी स्थितीच्या तुलनेत नव्या रुग्णांत ९० टक्के घट झाली. यंदा वर्षाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत दररोज ५० हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून येत होते. फेब्रुवारीनंतर युरोपात कोरोनाची नवी लाट आली आणि नव्या रुग्णांच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाली. मात्र ब्रिटनमध्ये फेब्रुवारीत नव्या रुग्णांचे प्रमाण दोन तृतीयांश घटले. पूर्वी सर्वाधिक बाधित असूनही ब्रिटनने कोरोना नियंत्रणात सर्वात यशस्वी उदाहरण मांडले आहे, असे तज्ञांना वाटते.
इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनने एका संशोधनाच्या आधारे ब्रिटनच्या यशाचे गमक सांगितले. ब्रिटनने जलदगतीने आणि व्यवस्थित टप्प्याने लॉकडाऊन लागू करून मृत्यूची साखळी खंडित करण्यात यश मिळवले. ब्रिटनने १४ डिसेंबरपासूून देशात लसीकरण सुरू केले. आतापर्यंत ब्रिटनमध्ये ४८ टक्क्यांहून जास्त लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे. ४ जानेवारीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊनची घोषणा केली होती.
जर्मनीत लहान पण कडक लॉकडाऊन शक्य
जर्मनीत नवे रुग्णांतील घट वेगाने होत नसल्याने सरकार चिंतीत आहे. चान्सलर अँगेला मर्केल लहान कालावधीचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहेत. जर्मनीत नोव्हेंबरपासून अनेक प्रकारची बंदी आहे. परंतु रुग्ण घटलेले नाहीत. म्हणूनच सरकारला असा लॉकडाऊन लावायचा आहे.
तक्रारीनंतरही ब्रिटनमध्ये लसीकरण सुरूच
ब्रिटनमध्ये एस्ट्राजेनेका लस दिली जातेय. अनेक देशांनी लसीमुळे रक्त गोठण्याची तक्रार केली व लसीकरण थांबवले. ब्रिटनने मात्र लसीमुळे हानीच्या तुलनेत लाखपट जास्त लाभ असल्याचे स्पष्ट केले. एस्ट्राजेनेका लस देण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. लसीकरणात युरोप पिछाडीवर पडले.
२१ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनची घोषणा
जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये ५० हजारांवर रुग्ण आढळून येत. पंतप्रधान जॉन्सन यांनी ४ जानेवारीला ६ महिन्यांसाठी राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केला. परंतु त्याची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितपणे केली. त्यात ८ मार्चपासून शाळा , २९ मार्चपासून दोन कुटुंबे किंवा ६ लोक बाहेर जाऊ शकतील इत्यादी नियम होते.
सहा महिन्यांच्या बंदीत प्रत्येक गोष्टीसाठी वेळेचे बंधन
ब्रिटनमध्ये लॉकडाऊनला सप्टेंबरमध्ये विरोध झाला. जानेवारीत नव्या लॉकडाऊननंतरही तुरळक विरोध झाला. परंतु सरकार ठाम होते. जानेवारीतील लॉकडाऊनमध्ये प्रत्येक गोष्टी सुरू होण्यासाठी वेळेची मर्यादा होती. म्हणून लोकांत घबराट नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.