आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:चीनच्या टेलिकॉम जाळ्यातून बाहेर पडण्याची ब्रिटनची तयारी, हुवावेवर पंतप्रधान जॉन्सन लादू शकतात बंदी

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक देशांचा हुुवावेवर टेलिकॉम उपकरणाद्वारे हेरगिरीचा आराेप

चीनची ५ जी नेटवर्क कंपनी हुवावेला अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही बंदीला तोंड द्यावे लागणार आहे. ब्रिटनचे टेलिकॉम चीफ हॉवर्ड वॉटसन यांनी सांगितले, जर मंत्र्यांच्या समूहाच्या आदेशावरून हुवावेची उपकरणे त्वरित काढावी लागली तर देशात दोन दिवस टेलिफोनचे नेटवर्क बंद राहील. ब्रिटनमध्ये ४ जी, २ जी व ५ जीचे जितक्या नेटवर्कमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अथवा टॉवर बसवण्यात आले आहेत ते संपूर्णत: हटवण्यास कमीत कमी पाच ते सात वर्षे तरी लागतील. पंतप्रधान बोरिस जॉन्सन हुवावेला ट्रायलसाठी दिलेली ५ जी नेटवर्कची मंजुरी कधीही परत घेऊ शकतात. जॉन्सन यांनी हुवावेची भागीदारी कमी करण्याची योजना तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हुवावेवर टेलिकॉम उपकरणांद्वारे हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे. हा धोका पाहता ब्रिटनशिवाय अमेरिका, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व तैवानने हुवावेचे ५ जी तंत्रज्ञान वापरण्यास बंदी घातली आहे अथवा नियम कठोर केले आहेत. आठवडाभरापूर्वी अमेरिकी फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे एफसीसी अध्यक्ष अजित पै यांनी टि्वटरवर पुराव्याच्या आधारे हुवावे आणि झेडटीई यांना अमेरिकेच्या कम्युनिकेशन नेटवर्क व राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे पत्रच सादर केले आहे.

भारताने हुवावेस चाचणीसाठी दिली परवानगी, मात्र स्पेक्ट्रम लिलावाच्या अटी कठाेर हव्यात

भारताने ५जी ट्रायलसाठी हुवावे व झेडटीईला आधीच परवानगी दिली आहे. टेलिकॉम इक्विपमेंट अँड सर्व्हिसेस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे डायरेक्टर जनरल आर. के. भटनागर यांनी यापूर्वीच म्हटले होते की, ५ जी ट्रायलसाठी कोणताही धोका नाही. ५ जी स्पेक्ट्रमनुसार कंपन्यांनी भारतात तयार केलेल्या उपकरणांचाच वापर करावा लागेल, असेे नियम सरकारने करावेत.

0