आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तचा 760 किलाेचा 2200 वर्षांपूर्वीचा दगड:ममीचे गूढ सांगणारा ‘राेसेटा स्टाेन’ ब्रिटनने परत करावा : इजिप्तने केली मागणी

इजिप्तएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील आश्चर्यामध्ये समाविष्ट पिरॅमिड व ममीचे गूढ सांगणारा राेसेटा स्टाेन परत द्यावा अशी मागणी इजिप्तने ब्रिटनकडे केली आहे. २२२ वर्षांपूर्वी इंग्रजांनी हा दगड इजिप्तमधून ब्रिटनला नेला हाेता. ब्रिटिश संग्रहालयात दर्शकांकडून सर्वाधिक पसंत केली जाणारी ही वस्तू मानली जाते. या माैल्यवान दगडाचे वजन ७६० किलाेग्रॅम आहे. ‘राेसेटा स्टाेन’ मुळेच जगाला इजिप्तची हियराेगिल्फिक भाषा समजू शकली आहे. त्यात तीन वेगवेगळ्या भाषांत एकच संदेश देण्यात आला आहे.

त्यात एक हियराेगिल्फिक भाषादेखील आहे. ही भाषा प्राचीन काळी इजिप्तमधील पुजारी बाेलत. या भाषेत त्यांचे बहुतांश धार्मिक ग्रंथ लिहिले आहेत. ‘राेसेटा स्टाेन’ मिळाल्यामुळेच १४०० वर्षांपूर्वी नामशेष झालेली हियराेगिल्फिक भाषेचा अनुवाद करणे शक्य झाले. हा दगड सर्वात आधी नेपाेलियनच्या सैन्याने १७९९ मध्ये इजिप्तच्या अल-राशिद शहरात शाेधून काढला हाेता. या शहराला इंग्रज राेसेटा टाऊन असे संबाेधत हाेते. इजिप्तचे पुरातत्त्वमंत्री जाही हवास पुढील महिन्यात ब्रिटिश संग्रहालयाला अर्ज करतील. त्यात ते राेसेटा स्टाेन परत मिळावा.

शिलालेखावर नव्या राजाच्या राज्याभिषेकाचा शाही आदेश राेसेटा स्टाेनवर तीन वेगवेगळ्या भाषांत इसवीसन पूर्व १९६ वर्षांपूर्वीचा एक शाही आदेश लिहिला आहे. त्यात एका नव्या राजाच्या राज्याभिषेकाचा उल्लेख आहे. भाषातज्ज्ञांनी त्या आधारे इजिप्तमधील राजांच्या भाषेला जगासमाेर सादर केले.

बातम्या आणखी आहेत...