आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:ब्रिटनमधील अनलाॅक जगासाठी धाेक्याची घंटा; संशाेधकांचा इशारा; ब्रिटन उद्यापासून पूर्णपणे अनलॉक होणार

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सचे आयफेल टॉवर 9 महिन्यांनंतर सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ते दीर्घ बंद हाेते. - Divya Marathi
फ्रान्सचे आयफेल टॉवर 9 महिन्यांनंतर सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ते दीर्घ बंद हाेते.

ब्रिटन साेमवारपासून अनलाॅक हाेणार आहे. त्यावर जगभरातील १२०० संशाेधकांनी चिंता व्यक्त केली. ब्रिटनचे अनलाॅक जगासाठी धाेक्याची घंटा ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. कारण ब्रिटन हे जागतिक परिवहन केंद्र आहे. येथे नवा काेराेना व्हेरिएंट आढळून आला तर त्याचा जगभरात फैलाव हाेण्यास फार वेळ लागणार नाही. मेडिकल जर्नल ‘लॅन्सेंट’ मध्ये ब्रिटनच्या अनलाॅक याेजनेसाठी एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये अनलाॅक असल्याने लसीला न जुमानणाऱ्या काेराेना व्हेरिएंटला फैलावाची संधी मिळणार आहे. त्यातून लसीकरणाची रणनीती कमकुवत हाेईल. सुमारे १२०० संशाेधकांनी या अहवालाचे समर्थन केेले. तसे पत्रही लॅन्सेंटला पाठवले आहे. त्याशिवाय न्यूझीलंड, इस्रायल, इटलीचे संशाेधक, डाॅक्टरांनी एका शिखर संमेलनात ब्रिटनच्या याेजनेवर टीका केली.न्यूझीलंडमध्ये तज्ज्ञ मायकेल बेकर म्हणाले, आम्ही वैज्ञानिक अभ्यासासाठी ब्रिटनकडून प्रेरणा घेताे. अनलाॅकची ही याेजना मात्र आम्हाला चकित करत आहे. १५ जानेवारीनंतर पहिल्यांदा एक दिवसात १५ हजार रुग्ण आढळले.

अमेरिका, फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांत रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंता
अमेरिकेतही काेराेनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शुक्रवारी काेराेनाचे ४०५०० हून जास्त रुग्ण आढळून आले. हा आकडा ८ मेनंतर समाेर आला. ब्राझील-४५५९१, फ्रान्स-१०९०८,स्पेन-३१००८, इंडाेनेशियात ५४ हजार रशियात २५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले. डेल्टा व्हेरिएंट १०६ हून जास्त देशांत पसरला आहे. बहुतांश देशांत या व्हेरिएंटने बाधितांची संख्या वाढत चालली आहे. लस घेणाऱ्यांना डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यूचा धाेका ९९ टक्के कमी असल्याचा दावा करण्यात आला. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंताही वाढली.

आॅस्ट्रेलिया : न्यू साऊथ वेल्समध्ये स्थिती गंभीर, पीपीई किटही कमी पडले
आॅस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये १११ नवे काेराेना रुग्ण आढळून येत आहेत. ९७ दिवसांनंतर एवढ्या संख्येने रुग्ण बाहेर पडत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने अनेक उपनगरांतील वाहतुकीवर बंदी घातली आहे. आॅस्ट्रेलिया शून्य काेराेना धाेरणाचे पालन करत आहे. सध्या १ हजार १२६ सक्रिय रुग्ण आहेत. न्यू साऊथ वेल्सच्या सिडनी शहरात पीपीई किटचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यानंतर स्वच्छता कामगारांनी रुग्णालयात स्वच्छता करण्यास नकार दिला. प्रशासनाने सिडनीत शनिवारी लहान व्यापाऱ्यांना दुकाने तसेच कार्यस्थळ बंद ठेवण्याचे आदेश दिले.

बीटा व्हेरिएंटची भीती : फ्रान्सहून येणारे लोक क्वाॅरंटाइन
फ्रान्समध्ये काेराेनाच्या बीटा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटचे दरराेज ५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. हे व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळले. या व्हेरिएंटवर अॅस्ट्राझेनेका लसीचा परिणाम हाेण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर ब्रिटनने फ्रान्समधून येणाऱ्या लाेकांना दहा दिवसांसाठी क्वाॅरंटाइन ठेवणे अनिवार्य केले. ब्रिटनने हे निर्बंध फ्रान्सहून येणाऱ्या लाेकांसाठी लागू केले आहेत. इतर देशांना त्यातून सवलत आहे.

बातम्या आणखी आहेत...