आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:2035 च्या सुरुवातीस अंतराळातील सौर पॅनलद्वारे निर्मित विजेवर चालेल

लंडन / ब्रिटन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०५० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ब्रिटनने अनोखी युक्ती योजली आहे. ब्रिटन अंतरा‌ळात सौर ऊर्जा केंद्र बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. एअरबस, केम्ब्रिज विद्यापीठासह ५० ब्रिटिश तांत्रिक संघटनांनी सरकारसोबत या उपक्रमासाठी हातमिळवणी केली आहे.

ब्रिटनने गेल्या वर्षी या दिशेने पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. त्याचा उद्देश सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत किमान गुंतवणुकीत शून्य ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनाचे उद्दिष्ट प्राप्त करणे हे आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष मार्टिन सोल्टो यांनी सांगितले की,‘अंतराळात सौर ऊर्जा केंद्र विकसित करण्यासाठी आवश्यक सर्व तंत्रज्ञान आधीपासूनच उपलब्ध आहे. हा प्रकल्प उभारण्याचे सर्व काम रोबोट करतील. ब्रिटनचे उद्दिष्ट २०३५ च्या सुरुवातीस पृथ्वीवर वीज पोहोचवण्याचे असेल. हा सौर प्रकल्प अंतराळाच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी स्पेसएक्सच्या स्टारशिपच्या आकाराच्या ३०० रॉकेटची गरज भासेल. एकदा तयार झाल्यानंतर तो सूर्यासह पृथ्वीला ३६,००० किलोमीटरची फेरी मारेल. हा प्रकल्प पृथ्वीवर काम करणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांप्रमाणेच सौर ऊर्जा एकत्र करेल.

पृथ्वीवरील याच आकाराच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेत तो १३ पट जास्त वीज बनवेल. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पाला वेळ, हवामानासंबंधी कुठल्याही प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही, कारण अंतराळात सूर्य नेहमी तळपत राहील. पृथ्वीवर अक्षय ऊर्जेशी जोडलेल्या प्रकल्पांना या समस्येचा सामना करावा लागतो कारण सूर्य नेहमी तळपत नाही. अशा प्रकल्पांना ऊर्जेची हानी टाळण्यासाठी बॅटरी साठ्यावर अवलंबून राहावे लागते. सध्या ब्रिटन आपल्या विजेच्या गरजेच्या ४०% पेक्षा जास्त वीज अक्षय ऊर्जेद्वारे मिळवतो, पण पुढील तीन दशकांत अक्षय ऊर्जेची मागणी तिप्पट होण्याची अपेक्षा आहे.

अँटिना मायक्रोवेव्ह विकिरण शोषून घेतील, विद्युत ऊर्जेत रूपांतरित करतील
अंतराळातून सौर ऊर्जा पृथ्वीवर आणण्यासाठी पृथ्वीवर विशाल अँटिना लावावा लागेल, त्याला रेक्टिना म्हणतात. तो विशाल खुल्या जाळीप्रमाणे असेल. त्यात अनेक लहान अँटिना लावलेले असतील. हे अँटिना अंतराळातून पाठवलेले मायक्रोवेव्ह विकिरण शोषून घेतील आणि त्यांचे विद्युत ऊर्जेत परावर्तन करतील. या विकिरणांमुळे लोकांना धोका असणार नाही, असा वैज्ञानिकांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...