आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिन्स फिलिप 1921-2021:एलिझाबेथ 13 वर्षांच्या असताना मने जुळल्यावर मिळाली प्रिन्स उपाधी, सात दशके सुखाने संसार

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांचे 99 व्या वर्षी निधन, जूनमध्ये साजरा करणार होते १०० वा वाढदिवस

ड्यूक ऑफ एडिनबरा आणि महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप (९९) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी विंडसर कॅसलमध्ये शुक्रवारी सकाळी अंतिम श्वास घेतला. अलीकडेच त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली होती. संसर्गानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १६ मार्चला त्यांना सुटी मिळाली होती. १० जून १९२१ ला जन्मलेले प्रिन्स फिलिप दोन महिन्यांनी १०० वा वाढदिवस साजरा करणार होते. फिलिप ब्रिटिश इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राजा राहिले. ते नेहमी महाराणींना साथ देत असत, त्यामुळे सर्वात सन्मानित व्यक्ती होते.

४ वेळा भारतात आले होते; पण वाघाच्या शिकारीमुळे टीका झाली

फिलिप यांनी चार वेळा भारताचा दौरा केला. तथापि, १९६१ मध्ये भारत दौऱ्याच्या वेळी एका वाघाची शिकार केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. सडेतोड टिप्पणी केल्यामुळे अनेकदा त्यांच्या प्रतिमेला तडाही गेला. पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही. त्यांनी नेहमी एलिझाबेथ यांना सर्वतोपरी साथ देणे आपले पहिले कर्तव्य मानले. १९६५ मध्ये त्यांनी एका मुलाखतीत आपले दु:ख व्यक्त करताना म्हटले होते की, मी चित्रपट, नाइट क्लब आणि पबमध्ये जाऊ शकत नाही. पण त्याबदल्यात जे फायदे मिळाले आहेत, त्याद्वारे त्याची भरपाई होते हेही मान्य केले होते. असा स्पष्टवक्तेपणा राजकुटुंबातील सदस्यांमध्ये खूपच कमी पाहायला मिळतो.

जबाबदार वडील आणि पती तसेच चांगले पायलट आणि खेळाडूही

प्रिन्स फिलिप यांचे चारही मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांची प्रतिमा आनंदी पण जबाबदार पती आणि पिता अशीच होती. पत्नीचे पद त्यांच्या संबंधांत आड आले नाही. महाराणींसोबत ते १४० देशांत २५० पेक्षा जास्त दौऱ्यांवर गेले. ७ दशके विनाअट सोबत केली. प्रिन्स फिलिप यांना विमान चालवण्याचे वेड होते. क्रिकेट आणि पोलो हे खेळ त्यांना आवडत होते. ब्रिटनच्या अव्वल पोलो खेळाडूंत त्यांची गणना होत होती. टीव्हीवर मुलाखत देणारे पहिले शाही सदस्य फिलिपच होते.

ग्रीसमध्ये किचन टेबलवर जन्म ते बकिंगहॅम पॅलेसपर्यंतचा प्रवास
ग्रीसच्या कोर्फूत किचन टेबलवर फिलिप यांचा जन्म झाला होता. १९२२ मध्ये त्यांच्या वडिलांवर देशद्रोहाचा आरोप झाल्याने कुटुंबाला निर्वासित व्हावे लागले. ब्रिटिश युद्धनौकेवर संत्र्याच्या पेटीपासून बनवलेल्या खाटेवर त्यांनी ग्रीस सोडला. आई सिझोफ्रेनियाने आजारी होती. त्यामुळे ती सोबत राहू शकली नाही. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांना ब्रिटनला पाठवण्यात आले. तेथेच शिक्षण झाले. १९३९ मध्ये रॉयल नेव्हीत सहभागी झाले. याच काळात त्यांनी १३ वर्षीय राजकुमारी एलिझाबेथ यांचे मन जिंकले होते. लग्नाआधी त्यांनी ग्रीक आणि डॅनिश किताबांचा त्याग करून ब्रिटिश नागरिकत्व घेतले. १९५२ मध्ये एलिझाबेथ महाराणी झाल्या तेव्हा साथ देण्यासाठी त्यांनी नेव्ही सोडली.

बातम्या आणखी आहेत...