आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगात मेदाचा जास्त वापर:फॉर्म्युला मिल्कमुळे आयक्यूला फटका नाही, ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील दावा

लंडन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवजात बाळाला फॉर्म्युला मिल्क पाजल्याने त्यांच्या बाैद्धिक पातळीवर (आयक्यू) काहीही फरक पडत नाही. ब्रिटनच्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या एका शाेधाद्वारे हा दावा करण्यात आला आहे. सामान्य दूध व फाॅर्म्युला असलेले दूध पिणाऱ्या मुलांची बाैद्धिक पातळी समान असल्याचे प्रयाेगातून दिसून आले.

संशाेधकांनी ११ ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील परिणामांचा अभ्यास केला. त्यात लहानपणी सामान्य दूध घेणारे व फाॅर्म्युला मिल्क घेतलेल्या अशा दाेन्ही प्रकारच्या मुलांचा समावेश हाेता. जास्त प्रथिने, लाेह, कार्बाेदके व मेदयुक्त फाॅर्म्युला दूध पाजण्याचा सकारात्मक परिणाम नवजात बालकांच्या बाैद्धिक विकासावर हाेताे, असे आधीचे संशाेधन सांगत हाेते. यातून मुलांचा मानसिक विकास चांगला हाेताे.

संशाेधकांनी या अभ्यासासाठी इंग्लंडच्या १७०० किशाेरवयीन मुलांची निवड केली हाेती. त्यात दाेन गट करण्यात आले हाेते. पहिला गट लहानपणी सामान्य दूध पिणाऱ्यांचा हाेता. दुसऱ्या गटात फाॅर्म्युला मिल्कचा लहानपणी वापर केलेली मुले हाेती. २०१८ मध्ये संशाेधकांनी दाेन्ही गटांतील मुलांना इंग्लिश व गणित विषयातील गुणांचा अभ्यास केला.

त्यात ११ ते १६ या वयाेगटातील दुसऱ्या गटातील म्हणजे लहानपणी फाॅर्म्युला दूध घेणाऱ्या मुलांचा आयक्यू सामान्य दूध घेणाऱ्या मुलांसमान हाेता, हे दिसून आले. इंग्लिश विषयात दाेन्ही गटातील मुलांनी समान गुण संपादन केले. ११ वर्षांपर्यंतच्या मुलांमधील ट्रेंड मात्र काहीसा वेगळा दिसून आला. फाॅर्म्युला दूध पिणाऱ्यांना इंग्लिश व गणितात सामान्य दूध घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी गुण मिळाले.

या मुलांमध्ये दाेन विषयात गुण कमी का झाले ? हे या संशाेधनातून स्पष्ट हाेत नाही. परंतु फाॅर्म्युला दुधाबद्दल लाेकांमध्ये असलेले गैरसमज आता संशाेधनामुळे दूर हाेण्यास मदत हाेईल, असे संशाेधकांना वाटते. त्याचबराेबर दूध निर्माता देखील फाॅर्म्युल्यात बदल करतील.

मातेचे दूध हाच नवजात बालकासाठी चौरस, सर्वाेत्तम आहार

आईचे दूध हेच नवजात बाळासाठी सर्वाेत्तम आहार असल्याचे संशाेधनातून स्पष्ट झाले आहे. यातून बाळांमध्ये आजारांशी लढण्याच्या क्षमतांचा विकास हाेताे. फाॅर्म्युल्याच्या दुधामुळे अनेकवेळा नवजातांमध्ये पचनासंबंधीच्या अडचणी दिसून आल्या आहेत. दाेन्ही प्रकारच्या बालकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून आली आहे.

बातम्या आणखी आहेत...