आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:ब्रिटनची कंपनी एस्ट्राजेनेकाने कोरोना व्हॅक्सीनची ट्रायल थांबवली, टेस्टिंगमध्ये समाविष्ट असलेली व्यक्ती पडली आजारी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने म्हटले - ट्रायल रोखणे ही नवी गोष्ट नाही, रुग्ण का आजारी पडला याचा तत्परतेने अभ्यास करत आहोत
  • ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून एस्ट्राजेनेका तिसऱ्या म्हणजेच अखेरच्या टप्प्याची ट्रायल करत आहे

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोना लस विकसित करणार्‍या लंडनमधील फार्म कंपनी एस्ट्राजेनेकाला क्लिनिकल चाचण्या थांबवाव्या लागल्या आहेत. हा निर्णय घ्यावा लागला कारण ट्रायलमध्ये समाविष्ट असलेली एक व्यक्ती आजारी पडली होती. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. असे होणे नवीन गोष्ट नसल्याचेही ते म्हणाले. तसेच असेही म्हटले आहे की रूग्णातील आजाराचे गांभीर्य अद्याप कळलेले नाही.

'ट्रायलमध्ये जास्त उशीर होणार नाही याची काळजी घेत आहोत'
एस्ट्राजेनेकाने म्हटले, ' जर ट्रायलच्या मध्येच एखाद्या वॉलंटियरमध्ये न समजणारा आजार (एनएक्सप्लेन्ड इलनेस) समोर आला तर ट्रायल रोखली जाते. मोठ्या ट्रायल्समध्ये कधी-कधी असे होते. मात्र याचा रिव्ह्यू अवश्य करायला हवा. ट्रायलच्या टाइमलानवर जास्त परिणाम होऊ नये यासाठी आम्ही हे तेजीने करत आहोत.

9 कंपन्यांची ट्रायल तिसऱ्या टप्प्यात आहे
एस्ट्राजेनेकाने तीसऱ्या फेजच्या क्लीनिकल ट्रायलसाठी 30 हजार वॉलंटियरच्या रजिस्ट्रेशन 31 ऑगस्टपासून सुरू केले होते. एस्ट्राजेनेका त्या 9 कंपन्यांमधून एक आहे ज्यांच्या व्हॅक्सीनचे ट्रायल तिसऱ्या म्हणजे अखेरच्या टप्प्यात आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser