आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माल्यााचे प्रत्यर्पण रखडले:ब्रिटिश हाय कमीशनने सांगितले- कायदेशीर समस्यांचे निराकरण होईपर्यंत प्रत्यर्पण शक्य नाही

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय माल्याला बुधवार रात्री किंवा गुरुवारी सकाळी भारतात आणत असल्याची बातमी समोर आली होती

आर्थिक गुन्ह्यातील फरार मद्य व्यापारी विजय माल्याला भारतात आणण्यात उशीर होऊ शकतो. भारतातील ब्रिटिश हाय कमीशनच्या प्रवक्त्याने  गुरुवारी सांगितले की, मागच्या महिन्यात प्रत्यर्पणाविरोधात माल्याची अपील अमान्य झाली होती. त्यानंतर, त्याने ब्रिटेनच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास नकार दिला होता. परंतू, आणखी एक कायदेशीर मुद्दा आहे, ज्याला त्याच्या प्रत्यर्पणापूर्वी सोडवणे गरजेचे आहे.

यापूर्वी बुधवारी रात्री सांगण्यात आले होते की, माल्याला कोणत्याही क्षणी भारतात आणले जाऊ शकते. ब्रिटेनमध्ये त्याच्या प्रत्यर्पणाची सर्व औपचारिकता पूर्ण झाली आहे. ब्रिटिश हायकमीशनने म्हटले की, या कायदेशीर समस्यांबाबत आम्ही तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाहीत. पण, आम्ही लवकरात लवकर यांना सोडवण्याचा प्रयत्न करू.

लंडन हायकोर्ट माल्याची अपील फेटाळली आहे

14 मे रोजी लंडन हायकोर्टाने विजय माल्याची भारत प्रत्यर्पणविरोधातील सुप्रीम कोर्टातील अपील करण्याची मागणी करणारी याचिका फेटालून लावली आहे. ही अपील फेटालून लावल्यानंतर त्याला 28 दिवसांच्या आत भारतात आणले जाऊ शकते. या गोष्टीला 20 दिवस उलटून गेले आहेत आणि त्याच्या भारतात येण्याची संपूर्ण प्रक्रीया झाली आहे. माल्याकडे आता कोणताच कायदेशीर मार्ग उरला नाही.

बातम्या आणखी आहेत...