आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटिश खासदारांची माध्यम स्वातंत्र्य आणि शेतकरी आंदोलनावरही चर्चा, भारताने ब्रिटिश उच्चायुक्तांकडे नोंदवला आक्षेप

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश संसदेच्या वेस्टमिंस्टर समिती कक्षात सोमवारी ‘भारतात शेतकऱ्यांची सुरक्षा’ आणि ‘माध्यम स्वातंत्र्या’ शी संबंधित ई-पिटिशन मोहिमेवर चर्चा झाली. त्यावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र सचिवांनी मंगळवारी नवी दिल्लीतील ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स अॅलिस यांना पाचारण केले आणि अधिकृत आक्षेप नोंदवला.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सांगण्यात आले आहे की, भारतात झालेल्या कृषी सुधारणांवर ब्रिटनच्या संसदेत झालेली चर्चा अनावश्यक आणि पक्षपातपूर्ण होती. हा दुसऱ्या लोकशाही देशाच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप आहे. दुसऱ्या लोकशाही देशाची एखादी घटना मोडतोड करून सादर करण्याचे मतपेढीचे राजकारण ब्रिटनच्या खासदारांनी टाळायला हवे.’ त्याआधी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने म्हटले होते की, आम्ही सतत याचिका संबंधित मुद्द्यांची माहिती देत आहोत. या पिटिशनवर एक लाखापेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षरी केलेली आहे. भारताचे कृषी कायदे हा त्या देशाचा ‘अंतर्गत मुद्दा’, आहे, असे ब्रिटनच्या सरकारने आधीच स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...