आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घूमजाव:ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक कोप बैठकीला जाणार!

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी घूमजाव केला आहे. पुढील आठवड्यात इजिप्तमध्ये होणाऱ्या कोप-२७ च्या बैठकीला हजर राहणार असल्याचे आता सुनक यांनी जाहीर करून टाकले आहे. हवामान बदल व पर्यावरणसंबंधी कोपची ही अत्यंत महत्त्वाची बैठक असून हा मंच आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा मानला जातो. व्यग्र वेळापत्रकामुळे या बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे सुनक यांनी आधी म्हटले होते. कोपचे ब्रिटिश अध्यक्ष वल माजी पंतप्रधान जॉन्सन यांचे निकटवर्तीय आलोक शर्मा यांनी सुनक बैठकीला जात नसल्यावरून टीका केली होती.पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची त्यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय बैठक आहे.

बातम्या आणखी आहेत...