आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • British Queen's Great grandson Will Go To A New School; Along With Armed Soldiers Deployed, Parents Protest | Marathi News

शाही शिक्षण:ब्रिटिश महाराणींचे पणतू जाणार नव्या शाळेत; सोबत सशस्त्र सैनिक तैनात, पालकांचा विराेध

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचे पणतू व इंग्लंडचे प्रिन्स विल्यम यांच्या मुलांच्या नव्या शाळेतील प्रवेशाला पालकांनी विराेध दर्शवला आहे. लंडनमधील सर्वात प्रतिष्ठित लॅमब्रुक शाळेत त्यांना प्रवेश मिळाला आहे. प्रिन्स विल्यम यांचा ९ वर्षीय मुलगा जॉर्ज व ७ वर्षीय मुलगी शर्लेट प्रेप वर्गातील अध्ययनाला सुरुवात करेल. चार वर्षीय लुईस प्री-प्रेपमध्ये शिकेल.

अलीकडेच प्रिन्स विल्यम पत्नी केटसह विंडसर पॅलेसमध्ये स्थलांतरित झाले. त्यामुळे त्यांच्या मुलांना लंडन येथील जुन्या थाॅमस बॅटरसी शाळेला साेडावे लागत आहे. विल्यम्स व त्यांची पत्नी केट मिडलटन यांच्या निर्णयाने तेथे शिक्षण घेणाऱ्या इतर मुलांच्या पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. शाही परिवारातील मुले या शाळेत शिकल्यास शाळेचे वातावरण आणखी गंभीर हाेईल, अशी शंका पालकांनी व्यक्त केली. एक पालक म्हणाले, शाही कुटुंबातील मुले शाळेत शिकायला आल्यामुळे शाळेच्या पार्कपासून काॅरिडाॅरपर्यंत सशस्त्र जवान तैनात झाले आहेत. शाळेचे वातावरण बदलून जाईल. शाळेतील वातावरण अगदी आैपचारिक हाेईल.

लॅमब्रुक शाळेची वर्षाची फी सुमारे ४६ लाख रुपये
लॅमब्रुक शाळेत शाही परिवारातील मुलांनी प्रवेश घेतला आहे. ही शाळा इंग्लंडमधील सर्वाेत्कृष्ट शाळांपैकी आहे. प्रिन्स विल्यम वर्षाची सुमारे ४६ लाख रुपयांची फी भरतील. या आधी राणी व्हिक्टाेरियांचे दाेन पणतूही शाळेत शिकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...