आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:फी न मिळाल्यामुळे कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता, त्यामुळे ब्रिटिश विद्यापीठे चिनी विद्यार्थ्यांना विशेष विमानाने परत आणताहेत

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 पेक्षा जास्त विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भाड्याने घेतली विशेष विमाने

कोरोनामुळे लावण्यात आलेले प्रवासावरील निर्बंध नजीकच्या भविष्यात हटणार नाहीत, त्यामुळे इतर देशांतील विशेषत: चीनमधून विद्यार्थी ब्रिटनला परतू शकणार नाहीत. त्यामुळे संस्थांचे कोट्यवधींचे नुकसान होईल, अशी भीती ब्रिटनमधील अनेक विद्यापीठांना वाटत असल्याने या संस्थांनी विमाने भाड्याने घेऊन चीनमधून विद्यार्थी-विद्यार्थिनींना परत आणणे सुरू केले आहे.

तज्ज्ञांनुसार, आतापर्यंत सुमारे ५० उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष विमाने तैनात केली आहेत. चिनी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात रसेल समूह अग्रभागी आहे. हा समूह लंडन, ब्रिस्टलच्या इंपीरिअल कॉलेजसहित सुमारे २४ मोठ्या शिक्षण संस्थांचे संचालन करतो. समूहाने आतापर्यंत चार विमानांद्वारे चीनच्या १२०० विद्यार्थ्यांना आणले आहे. विद्यार्थ्यांना लंडनच्या हिथ्रो विमानत‌ळ परिसरापर्यंत नेण्याचा आणि तेथे १० दिवस आयसोलेशनदरम्यान त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्चही संस्था करत आहे. ब्रिटनमधील विद्यापीठांच्या आंतरराष्ट्रीय संचालक विवियन स्टर्न यांनी सांगितले की,‘ज्या संस्थांत विदेशी, विशेषत: चीनचे विद्यार्थी जास्त आहेत, त्या संस्थांना जास्त अडचणी आहेत. चीनमधून विद्यार्थ्यांना हाँगकाँगमार्गे विशेष विमानाने आणण्याची व्यवस्था केली जात आहे’

भारतीय विद्यार्थ्यांनाही अपेक्षा : या प्रकारामुळे भारतीय विद्यार्थ्यांचीही अपेक्षा वाढली आहे. चीननंतर येथे दुसरी सर्वाधिक संख्या भारतीयांची आहे. एका संस्थेनुसार, २०१९-२० मध्ये सुमारे ५५,४६५ भारतीय विद्यार्थी होते, ऑगस्ट २०२१ मध्ये त्यात १९%वाढ झाली.

पण ब्रिटनमध्ये विरोधाचेही सूर : विदेशी विद्यार्थ्यांना महत्त्व दिल्याने ब्रिटनमध्ये विरोधाचे सूर लावले जात आहेत. ‘आमच्या शिक्षण संस्था उत्पन्न वाढवण्यासाठी ब्रिटिश विद्यार्थ्यांच्या हिताची जोखीम घेणार आहेत काय?,’ असा प्रश्न बंकिंघम विद्यापीठाचे प्रा. अॅलन स्मिथर्स यांनी उपस्थित केला.

ब्रिटनमध्ये चीनचे २.२० लाख विद्यार्थी, १३ हजार कोटी रुपये फी देतात
आकड्यांनुसार, ब्रिटनमध्ये २.२० लाख विद्यार्थी चीनचे आहेत. रसेल समूहाच्या शिक्षण संस्थांतच सुमारे अर्धे विद्यार्थी चीनचे आहेत. त्यांच्याकडून समूहाला दर वर्षी १.३ अब्ज पौंड (१३ हजार कोटी रुपये) ट्यूशन फी मिळते. २०१९ मध्ये लिव्हरपूल विद्यापीठात अर्धे आणि ग्लासगोत एक तृतीयांश विद्यार्थी चीनचे होते. त्यामुळेच या सर्व संस्था त्यांची सरबराई करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...