आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Britten Coronavirus Outbreak: Claims By Those Close To The Prime Minister On The Deteriorating Situation; News And Live Updates

ब्रिटन:जॉन्सन म्हणतात, कोरोना म्हणजे भयकथा; त्यांना लॉकडाऊनही चूक असल्याचे वाटायचे; बिघडलेल्या परिस्थितीवर पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांचा दावा

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य नाही : कमिन्स

कोरोनाच्या लाटेत ब्रिटिश सरकार खूपच निष्काळजीपणे वागले त्यामुळेच येथील परिस्थिती अधिकच बिकट झाली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे काेराेना म्हणजे केवळ एक “भयकथा’ असल्याचे मानतात म्हणून कोरोनाशी लढण्यात ब्रिटन सरकार मागे पडले, असा दावा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे निकटवर्तीय आणि माजी सहयोगी डॉमिनिक कमिन्स यांनी केला आहे. कमिन्स यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांच्या संयुक्त समितीसमोर साक्ष देताना अनेक स्फोटक दावे केले अाहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य समजले नाही असे जॉन्सनचे माजी मुख्य रणनीतिक सल्लागार कमिन्स यांनी म्हटले आहे. कमिन्स पुढे म्हणाले की, जॉन्सन हे सुरुवातीला काेराेना म्हणजे स्वाइन फ्लू असेच समजत हाेते अाणि त्याबद्दल अनावश्यक भीती बाळगण्यात येत असल्याचे त्यांचे मत हाेते. त्यामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर ताे लवकरात लवकर संपण्यासाठी ते जास्त उत्सुक झाले हाेते. इतकेच नाही ते एप्रिल २०२० मध्ये तर लाॅकडाऊन करणे हीच एक माेठी चूक असल्याचे त्यांना वाटू लागले हाेते. कमिन्स यांनी काेराेना महामारीत मरण पावलेल्यांच्या कुटुबीयांची माफीदेखील मागितली.

बातम्या आणखी आहेत...