आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:बाधित 27 जणांच्या संपर्कात 10 हजार लोक; व्हिक्टोरियात कडक लॉकडाऊन; बी 1617.1 कोविड व्हेरिएंट आढळल्यामुळे ऑस्ट्रेलियात घबराट

मेलबर्न2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोवीस तासांत दुप्पट रुग्ण आढळले, 150 हॉटस्पॉटची आेळख.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियात बी १६१७.१ व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळल्याने घबराट निर्माण झाली आहे. गुरुवारी अशा रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली होती. या प्रतिरूपाने बाधित व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण व्हिक्टोरियात गुरुवारी रात्रीपासून ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. सध्या राज्यात संसर्गाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आता लॉकडाऊनमध्ये लोकांना अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरापासून पाच किमीपेक्षा जास्त अंतर जाण्याची गरज भासणार नाही.

घरातील केवळ एका व्यक्तीलाच घराबाहेर पडता येऊ शकेल. अनिवार्य रूपाने मास्कचा वापर करावा लागेल. शाळा बंद राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. शेजारी राज्यांनीदेखील व्हिक्टोरिया राज्याच्या सीमा सील केल्या आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व तस्मानियाने सीमाबंद केल्या आहेत. क्वीन्सलँड प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सात दिवसांसाठी क्वाॅरंटाइन व्हावे लागेल. न्यू साऊथ वेल्स राज्याने व्हिक्टोरियाहून येणाऱ्या लोकांसाठी सात दिवसांच्या होम आयसोलेशनचा नियम लागू केला आहे.

लसीसाठी प्रचंड गर्दी, बुकिंग साइट क्रॅश झाली
मर्लिनो म्हणाले, राज्यात लसीकरण कार्यक्रम अपेक्षेपेक्षा मंदगतीने सुरू आहे. त्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील केंद्र सरकारला दोषी ठरवले. ४०-४९ वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्हिक्टोरियातील निम्मी लोकसंख्या लसीकरणासाठी योग्य आहे. नवीन विषाणू प्रतिरूपाचा फैलाव झाल्याने लसीकरणात गती आली आहे. गुरुवारी सकाळी लसीसाठी नोंदणी करणारे संकेतस्थळ बंद पडले. हॉटलाइनदेखील संपूर्ण दिवसभर व्यग्र होती. त्यावरून लोकांमध्ये किती घबराट निर्माण झाली आहे, हे लक्षात येते. लोकांमध्ये लसीसाठी जागृतीचे देखील प्रयत्न केले जात आहेत.

१५० हून जास्त संभाव्य धोक्याची ठिकाणे
व्हिक्टोरिया राज्याचे कार्यवाह जेम्स मर्लिनो म्हणाले, विषाणूच्या तपासणीसाठी जाणाऱ्यांना जास्त धोका आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना १० हजारांहून जास्त प्राथमिक व द्वितीय पातळीवरील संपर्कातील लोकांची आेळख पटली आहे. संभाव्य १५० जोखमीची ठिकाणे त्यांनी शोधल्यानंतरही त्यांचा संघर्ष सुरू आहे. सामान्यपणे विषाणूचा संसर्ग होण्यासाठी ५-६ दिवसांचा कालावधी लागतो. त्यापैकी काही प्रकरणांत २४ तासांहून कमी वेळ लागतो. २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. आपण कठोर पावले उचलली नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.

फ्रान्सने बक्वारंटाइन अनिवार्य
ब्रिटनमधून फ्रान्समध्ये येणाऱ्यांना आता क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. पुढील आठवड्यापासून हा नियम लागू केला जाणार आहे. भारतात आढळून आलेल्या व्हेरिएंटचा संसर्ग ब्रिटनमध्येही होत आहे. त्यामुळे फ्रान्स सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर प्रवाशांना ४८ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल देखील दाखवावा लागणार आहे. पूर्वी त्याचा कालावधी ७२ तास होता. सध्या फ्रान्समध्ये ब्राझील, भारत, अर्जेंटिना, तुर्कीसह १६ देशांतून येणाऱ्या लोकांना १० दिवस अनिवार्य क्वारंटाईनला सामोरे जावे लागते. नियमभंग केल्यास सुमारे १.३२ लाख रुपयांचा दंडाची तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...