आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • King Charles III Coronation Buckingham Palace; Throwing Suspected Shotgun Cartridges | Buckingham Palace

बकिंगहॅम पॅलेसबाहेर काडतुसे फेकली, आरोपीला अटक:संशयास्पद बॅगही आढळली; किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या 4 दिवस आधी घडली घटना

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यूके पोलिसांनी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर एका व्यक्तीला अटक केली आहे. बंदुकीची काडतुसे राजवाड्यात फेकल्याचा त्याच्यावर आरोप आहे. किंग चार्ल्स-III यांच्या राज्याभिषेकाच्या 4 दिवस आधी ही घटना घडली. विशेष म्हणजे 6 मे रोजी राजा चार्ल्स-III चा राज्याभिषेक सोहळा होणार आहे.

चार्ल्स III हे वेल्सचे माजी प्रिन्स आणि क्वीन एलिझाबेथ II यांचे मोठे सुपुत्र सप्टेंबर 2022 मध्ये त्यांची आई मरण पावल्यावर ब्रिटनचे राजा बनले. आता एका धार्मिक समारंभात मुकुट परिधान करून त्यांचा औपचारिक राज्याभिषेक होणार आहे.

मंगळवारी सायंकाळी घडली घटना, संशयास्पद बॅगही आढळली

स्कॉटलंड यार्डच्या म्हणण्यानुसार, ही व्यक्ती मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता राजवाड्याच्या गेटवर आली आणि तिने शॉटगन काडतुसे जमिनीवर फेकून दिली. काही वेळातच पोलिसांनी कारवाई करत त्याला पकडले आणि जागेची नाकाबंदी करण्यात आली. सर्वसामान्यांचे येणे-जाणेही बंद झाले.

पोलिसांनी बॅग तपासासाठी पाठवली आहे.
पोलिसांनी बॅग तपासासाठी पाठवली आहे.

अटक करण्यात आलेल्या डेव्हिडजवळ पोलिसांना एक संशयास्पद बॅगही सापडली आहे. ज्याचा तपास सुरू आहे. मात्र, आरोपीला अटक झाल्यानंतर लोकांसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.

मेट्रोपॉलिटन पोलिसांकडून तपास सुरू

मेट पोलिस प्रमुख जोसेफ मॅकडोनाल्ड म्हणाले की, गोळीबार झाल्याचे, अधिकारी किंवा लोकांपैकी कुणाला दुखापत झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. तेथे पकडलेल्या डेव्हिडची अधिक चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, डेव्हिडला अटक करण्यात आली तेव्हा राजा आणि राणी बकिंगहॅम पॅलेसमध्ये नव्हते.

मुंबईतही किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाची जय्यत तयारी

महाराष्ट्रात मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवालेही किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या तयारीत गुंतले आहेत. या डबेवाल्यांनी ब्रिटनच्या नव्या राजाची भेट म्हणून वारकरी समाजाकडून पुणेरी पगडी आणि शाल खरेदी केली. ब्रिटीश वाणिज्य दूतावास, ब्रिटीश दूतावास यांनी आमंत्रित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.