आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:अपह्रत शिख कुटुंबियांचे जळालेले वाहन जप्त, संशयित अटकेत

लाॅस एंजिलिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात शिख कुटुंबाच्या अपहरणप्रकरणी दोन खुलासे झाले. प्रकरणातील ‘संशयित’ व्यक्तीला अटक झाली आहे. त्याचे नाव जीसस मॅनुएल सलगाडो आहे. त्याने मंगळवारी स्वत:ला मारण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. कुटुंब अद्याप बेपत्ता आहे. पीडित कुटुंबाचे जळालेले वाहन जप्त केले आहे. त्याच्या आधारे अधिकाऱ्यांनी चौघांचे अपहरण झाल्याचे मानले आहे. शेरिफ ऑफिसनुसार, चौघांचे बळजबरी राष्ट्रीय महामार्ग ५९ च्या व्यवसायिक सेंटरमधून अपहरण केले आहे. अपहरणकर्त्यांकडे शस्त्रे होती. ते अत्यंत धोकादायक आहेत. पोलिसांनी त्यांचे स्केच जारी करत सामान्य लोकांना त्याची ओळख पटवण्यास मदतीचे आवाहन केले आहे. पीडित कुटुंब मूळ पंजाबच्या होशियारपूरचे आहे. अपह्रत लोकांमध्ये ८ महिन्यांची आरुही, त्याची आई जसलीन कौर, वडील जसदीप सिंह आणि काका अमनदीप सिंहचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...