आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रास्त्र व्यापार:पाकिस्तान-अफगाण सीमेवरशस्त्रास्त्र विक्रीचा ‘बुश बाजार’, नाटो सैन्य परतल्यामुळे शस्त्रविक्रीत वाढीचा धोका

पेशावर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानहून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटाे सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर देशात शस्त्रास्त्रांच्या व्यवसायाला पुन्हा वेग येत आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानदरम्यानच्या २६०० किमी लांबीच्या सीमेवर दाेन्ही बाजूंनी शस्त्र विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जुन्या साथीदारांशी संपर्क सुरू केला आहे. पाक-अफगाण सीमा अनेक दशकांपासून काेणताही कायदा नसलेला भाग राहिलेला आहे.

खैबरपख्तुनख्वाशी संबंधित या भागात अमेरिकी एम-४ पिस्तूल असाे की इतर काेणतेही शस्त्र, आॅर्डर देताच हाताेहात डिलिव्हरीही केली जाते. या व्यापाऱ्यांकडे चीनहून येणारी शस्त्रे व आपल्या कारखान्यातील शस्त्रेही दिसून येतात. या शस्त्रास्त्रांची विक्री पाक-अफगाणिस्तानच्या सीमेवर बुश बाजारात केली जाते. २००१ मध्ये अमेरिकेने सैन्य पाठवले हाेते. तेव्हापासून या भागाला बुश बाजार तसेच सितारा-जहांगीर बाजार म्हणूनही आेळखले जाते.

मेड इन चायनाची शस्त्रेही बाजारात, स्वस्त पण विश्वासार्ह नाहीत
शस्त्रास्त्राचे एक पुरवठादार खालिद म्हणाले, बुश बाजारात अमेरिकन शस्त्रांसह चिनी शस्त्रास्त्रेही उपलब्ध आहेत. दाेन दशकांपूर्वी साेव्हिएतच्या शस्त्रांची देखील विक्री केली हाेती. आता चीनची शस्त्रेही बुश बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. ते स्वस्त असले तरी विश्वासार्ह नाहीत.त्यामुळे खरेदीदारांचा त्याकडे कल नसतो.

कराचीहून अफगाण येणाऱ्या कंटेनरची डाेंगरात लुटालूटही
नाटाे सैन्य अफगाणिस्तानात तैनात हाेते. तेव्हा शस्त्रांस्त्रांची खेप पाकिस्तानचे बंदर कराचीमध्ये येत. तेथून हा ताफा कंटेनरमध्ये भरून रस्ते मार्गे खैबरपुख्तुनख्वा मार्गे अफगाणिस्तानच्या नाटाे तळापर्यंत पाेहाेचवला जात असे. याच मार्गावर बंडखाेर कंटेनरची लूट करायचे. काहीवेळा तर नाटाे तळापर्यंत जाणारे कंटेनर अर्धे व्हायचे.

व्हिडिआे काॅल करून बुकिंग, कमी वेळेत डिलिव्हरी
पाक-अफगाणिस्तान सीमेवर शस्त्रास्त्र विक्री करणारे अहमद आपल्या स्मार्टफाेनवरून व्हिडिआे काॅलने बुकिंग करताात. अहमद म्हणाले, हवे ते शस्त्र आम्ही खरेदीदारापर्यंत अत्यंत कमी वेळेत पाेहाेचवताे. दाेन दशकांपासून अहमद शस्त्र विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहेत. आगामी काळात व्यापारात तेजी येईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...