आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस स्कूलचा अहवाल:संयुक्त बँक खात्याच्या विवाहित जोडप्यांचे नाते दीर्घकाळ टिकते, त्यांच्यात भांडणे होतात कमी

वृत्तसंस्था | लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आनंददायक जीवनासाठी विवाहित जोडप्यांचे संयुक्त बँक खाते असणे आवश्यक आहे. यामुळे पती-पत्नीत भांडणे कमी होतात आणि दीर्घकाळ नातेसंबंध टिकून राहते. विशेष म्हणजे, घरखर्चाबाबत दोघांनाही चांगला अनुभव मिळतो.

इंडियाना युनिव्हर्सिटीतील केली स्कूल ऑफ बिझनेसद्वारे नुकतेच केलेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. संशोधनानुसार, संयुक्त बँक खाते असणारे जोडपे वेगवेगळे बँक खाते असणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत आनंदी असतात. या अभ्यासासाठी काही जोडप्यांवर दोन वर्षे निगराणी करून त्यांचे नातेसंबंध आणि वित्तीय स्थितीची पाहणी केली.

काही जोडप्यांना संयुक्त खाते उघडण्यास सांगितले तर काहींना वेगवेगळे खाते ठेवण्यास सांगितले. काहींना स्वत: निर्णय घेण्यास सांगितले. दोन वर्षांनंतर सर्वांकडून त्यांच्या नात्यातील गुणवत्तेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आली. यात समोर आले की, संयुक्त खाते उघडण्याल्यामुळे दोघांमध्ये वित्तीय स्थितीबाबत पारदर्शकता निर्माण झाली. यामुळे दोघांमध्ये चांगले नाते तयार झाले. स्वतंत्र खात्यामुळे दोघांच्या नात्यातील गुणवत्ता खराब झाली. संशोधनात सहभागी बहुतांश लोकांचे सरासरी वय २८ वर्ष होते. तीन चतुर्थांश लोक श्वेतवर्णीय होते आणि १२% कृष्णवर्णीय होते. सहा वर्ष पदवीचे ३६% लोकही सहभागी होती. यात मध्यम उत्पन्नाचे लोकही सहभागी होते.