आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिनिव्हा:2050 पर्यंत 4 पैकी एकास श्रवणदाेष समस्या, 73 लाख काेटींचे नुकसान : आराेग्य संघटना

जिनिव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील प्रत्येकी चारपैकी एका व्यक्तीला २०५० पर्यंत श्रवणदाेषाच्या समस्येला ताेंड द्यावे लागू शकते. एेकायला कमी येणे यासारख्या समस्या जाणवू शकतात, असा इशारा जागतिक आराेग्य संघटनेने मंगळवारी दिला आहे.

श्रवणासंबंधी समस्यांवर आधारित हा जगातील पहिलाच अहवाल आहे. त्यानुसार श्रवणाच्या अनेक समस्यांना राेखता येऊ शकते. संसर्ग, वाढता गाेंगाट, जीवनशैली, गॅजेटचा वाढता वापर इत्यादी गाेष्टींचा त्यात समावेश आहे. या समस्येच्या निराकरणासाठी आणि बचावासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला जागतिक आराेग्य संघटनेने दिला आहे.

या समस्येपासून बचावासाठी विशेष पॅकेजचा प्रस्तावही जागतिक आराेग्य संघटनेने दिला आहे. पॅकेजमध्ये प्रतिव्यक्ती वार्षिक सुमारे १.३३ डाॅलर (सुमारे १०० रुपये) खर्च येणार आहे. ही समस्या जास्त वाढल्यास जगाला दरवर्षी सुमारे १ लाख काेटी डाॅलरचा ( ७३ लाख काेटी रुपये) फटका बसू शकताे.

बातम्या आणखी आहेत...