आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:कॅल्शियमच्या गोळीमुळे वयस्करांतील हृदयविकाराने मृत्यूची शक्यता 33% वाढते, सोबत व्हिटॅमिन डी हवे

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हाडांमध्ये वेदना जाणवू लागताच वैद्यकीय तपासणी न करताच कॅल्शियम गोळ्या सुरू केल्या जातात. कारण बळकट हाडांसाठी कॅल्शियम गरजेचे असते हे सर्वांना ठाऊक आहे. परंतु ही गोष्ट धोकादायक ठरते. कारण कॅल्शियमला शाेषून घेण्यासाठी सोबत व्हिटॅमिन डी घेतले जात नसल्याची स्थिती जाेखमीची ठरू शकते. ब्रिटनच्या २६५० लोकांवर याबाबतचे संशाेधन करण्यात आले. त्याबाबतचा शाेधप्रबंध ‘हार्ट’ मध्ये प्रकाशित झाला आहे. कॅल्शियमच्या गोळीमुळे वयस्करांमध्ये हृदयविकाराचा धोका सामान्यांहून एक तृतीयांश म्हणजे (३३ टक्के) वाढतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. स्वतंत्रपणे घेतलेले कॅल्शियम शरीर या वयात शाेषून घेऊ शकत नाही.

त्यामुळे हृदयाच्या महाधमनीची झापड बंद होऊ शकते. स्टेनोसिसच्या व्हॉल्व्हवर कॅल्शियमचे थर साचतात. त्यामुळे त्याची उघडझाप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यातून शरीरातील ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. ओहियोमधील क्लीव्हलँड क्लिनिक फाउंडेशनच्या संशाेधकांनी पाच वर्षे याबाबत अभ्यास केला. कॅल्शियमसोबत व्हिटॅमिन डी घेतले नाहीतर हृदयासंबंधी विकारांमुळे मृत्युमुखी पडण्याची शक्यता दुपटीने वाढते, असा दावा संशाेधकांनी केला आहे. २०१० मध्ये ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या एक अहवाल जाहीर झाला होता. त्यामध्येही कॅल्शियम घेणाऱ्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते, असे त्यात नमूद करण्यात आले होते.

नैसर्गिक कॅल्शियम चांगले, आवश्यक
कॅल्शियम हाडे व दातांसाठी गरजेचे असते. त्याची कमतरता झाल्यास मुलांना त्रास जाणवतो. मुलांमध्ये तो ऑस्टियोपोरोसिसच्या रूपाने दिसतो. खरे तर डेअरी उत्पादने, हिरव्या पालेभाज्या, काही मासे यातून कॅल्शियम सहज उपलब्ध होते. नैसर्गिक कॅल्शियम गोळ्यांपेक्षा केव्हाही चांगले आहे. तितकेच ते आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...