आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅलिफोर्निया गोळीबार:संशयित हल्लेखोर मृतावस्थेत आढळला, व्हॅनमध्ये स्वत:वर गोळी झाडल्याचा संशय

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 21 जानेवारी रोजी झालेल्या सामूहिक गोळीबारप्रकरणी पोलिसांना एका व्हॅनमध्ये हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे. लॉस एंजेलिस टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सामूहिक गोळीबाराच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याला क्रूर आणि मूर्खपणाचे कृत्य म्हटले आहे. यासोबतच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ अमेरिकेचा ध्वज अर्ध्यावर फडकणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

रात्रीपासून पोलिसांची शोधमोहीम सुरू होती
शनिवारी रात्री उशिरापासून हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. संशयित हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना ही व्हॅन दिसताच त्यांनी घेराव घातला. हल्लेखोर हा मूळचा आशियाई असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे समजू शकलेले नाही.

आता संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घ्या...
1. चिनी नववर्षाच्या उत्सवादरम्यान घडली घटना

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 21-22 जानेवारीच्या मध्यरात्री सामूहिक गोळीबाराची घटना घडली. मॉन्टेरी पार्क परिसरात असलेल्या एका डान्स हॉलमध्ये चंद्र नववर्षाचे सेलिब्रेशन सुरू होते. तेव्हा एका हल्लेखोराने येथे अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

2. हल्लेखोर 20 मिनिटांनी दुसऱ्या डान्स हॉलमध्ये घुसला
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॉन्टेरी पार्क परिसरातील डान्स हॉलवर हल्ला केल्यानंतर 20 मिनिटांनी हल्लेखोर अल्हंब्रा भागातील दुसऱ्या डान्स हॉलमध्ये घुसला. येथे उपस्थित लोकांशी त्याची बाचाबाची झाली. लोकांनी त्याची बंदूक हिसकावून घेतली, त्यानंतर तो तेथून पळून गेला.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले- एक आशियाई व्यक्ती हॉलमध्ये शिरला. त्याच्या हातात बंदूक होती. आम्ही त्याची बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याची बंदूक काढून घेताच तो पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळून गेला. याची संपूर्ण माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे.

हा नकाशा प्रतीकात्मक आहे. मोंटेरी पार्क आणि अल्हंब्रा 3 किलोमीटर अंतरावर आहेत.
हा नकाशा प्रतीकात्मक आहे. मोंटेरी पार्क आणि अल्हंब्रा 3 किलोमीटर अंतरावर आहेत.

3. पोलिसांनी संशयित आशियाई पुरुषाचा फोटो जारी केला
पोलिसांनी संशयित हल्लेखोराचा फोटो जारी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे वय 30 ते 50 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी फोटोसोबत लिहिले - संशयित एक आशियाई व्यक्ती असूनत्याची उंची 5 फूट 10 इंच आहे. काळे लेदर जॅकेट, काळी टोपी आणि चष्मा घातलेला तो घटनास्थळी दिसला होता.

4. पोलिसांनी संशयिताच्या कारला घेराव घातला
लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संशयित आणि त्याच्या वाहनाचा शोध वाढवला. यूएस वेळेनुसार, रविवारी सकाळी (22 जानेवारी) पोलिसांना संशयिताचे पांढरे वाहन टोरेन्स परिसरात पार्किंगमध्ये पार्क केलेले आढळले. पोलिसांनी लगेचच घेराव घातला. मॉन्टेरी पार्कपासून टॉरन्स अंदाजे 48 किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे तासभर वाट पाहिल्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा उघडला, तेथे त्यांना एक मृतदेह आढळून आला.

हे प्रकरण वर्णभेदाशी संबंधित असू शकते
काही सोशल मीडिया अकाउंटवर हे प्रकरण वर्णभेदाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक लोक आणि आशियाई समुदायामध्ये हिंसाचार झाला. यामध्ये चिनी वंशाच्या 17 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. या संदर्भात काही वेळात पोलीस निवेदन देऊ शकतात. मॉन्टेरी पार्कची लोकसंख्या सुमारे ६०,००० आहे. यापैकी 65% आशियाई अमेरिकन आहेत. यातील बहुतांश लोक चिनी वंशाचे आहेत.

गाण्याच्या तीव्र आवाजाने गोळीबाराचा आवाज ऐकण्यास आला नाही
‘स्काय न्यूज’ने स्थानिक प्रशासनाचा दाखला देत म्हटले आहे की, गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्यामुळे काहीवेळापर्यंत हा गोळीबार झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. अनेकांना ही आतषबाजी असल्याचे वाटले. पण नंतर जखमी जीवाच्या आकांताने पळत असल्याचे पाहून वस्तुस्थिती लक्षात आली.

बातम्या आणखी आहेत...