आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक:डोनाल्ड ट्रम्प यांना हळव्या मनाचे दर्शवण्यासाठी मोहीम सुरू, जाहिरात, भाषणातून ट्रम्प, बायडेन यांच्यात तुलना केली जातेय

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभियानात दोन कारणांमुळे बदल पहिले- डेमोक्रॅटने संमेलनात बायडेन यांचा करुणेचे प्रतीक म्हणून केला प्रचार दुसरे - उपनगरीय मतदारांतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उग्र स्वभाव त्यांच्या निवडणुकीतील विजयात अडथळा ठरू शकतो, असे अमेरिकेतील रिपब्लिकदा मिळू शकतो. म्हणून रिपब्लिकनने ट्रम्प यांना हळव्या मनाचा व्यक्ती म्हणून सादर करण्याची मोहीम सुरू केली आहे. उपनगरातील मतदारांचा विश्वास जिंकण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू झाली. कोरोना संकटात ट्रम्प यांची भूमिका, स्वभाव व खोटेपणामुळे हा वर्ग दूर जात होता. २०१६ च्या निवडणुकीत या मतदारांची भूमिका महत्त्वाची होती. फॉक्स न्यूजच्या पाहणीनुसार ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनाच्या उपनगरांत २४ गुणांनी विजय मिळवला होता. या वेळी २१ अंकांनी पराभव होऊ शकतो. फ्लोरिडाच्या उपनगरांत ट्रम्प तेव्हा १० गुणांनी जिंकले होते. यंदा ६ अंकांनी पराभूत होऊ शकतात. रिपब्लिकन पार्टी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उपनगरांमध्ये १९८० पासून आतापर्यंत केवळ तीन वेळा (१९९२, १९९६, २००८) पराभूत झाली. या उपनगरांमध्ये गरीब, कृष्णवर्णीय, स्थलांतरित लोक जास्त संख्येने राहतात.

जाहिरात : ट्रम्प यांच्या निवडणूक अभियान टीमने ‘नो मिस्टर नाइस गाय’ अशी जाहिरात केली आहे.

मेलानियांचे व्हाइट हाऊस तर जिल यांचे शाळेतून भाषण
दोन्ही पक्षांच्या संमेलनात दोन मुख्य फरक दिसून आले. मेलानिया यांनी व्हाइट हाऊसमध्ये भाषण दिले. बायडेन यांची पत्नी जिल यांनी डेलावर येथील एका शाळेत आपले भाषण दिले. जिल त्या शाळेत पूर्वी शिक्षिका होत्या. एवढेच नव्हे तर रिपब्लिकन नेत्यांनी गर्दीत उभे राहून भाषण केले.

गौरव : संपूर्ण कार्यक्रमात रिपब्लिकन नेत्यांनी ट्रम्पना दयेचे प्रतीक संबोधले

संमेलनात रिपब्लिकन नेते स्टीव्ह स्कालिस म्हणाले, मला गोळी लागली होती. ट्रम्प रुग्णालयात माझ्याजवळ बराच वेळ बसून होते. जिम जॉर्डन म्हणाले, माझ्या नातेवाइकाच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. ट्रम्प यांनी कुटुंबांचे सांत्वन केले होते.

भाषण : देशात वंशभेदावरून अशांतता हे सत्य, गर्व कशी करू : मेलानिया
ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनी व्हाइट हाऊसमध्ये भाषण दिले. त्या म्हणाल्या, अमेरिका ट्रम्प यांच्या हृदयात वसते. देशात वंशभेदावरून अशांतता आहे. हे कडवे सत्य आहे. म्हणूनच आम्हाला इतिहासातील काही गोष्टींवर गर्व वाटत नाही.

रणनीती : जाहिरात, भाषणातून ट्रम्प, बायडेन यांच्यात तुलना केली जातेय
टिफनी डोनाल्ड ट्रम्प यांचे चौथे अपत्य. समाजसेवक अशी तिची आेळख. व्हाइस हाऊसमध्ये टिफनीने भाषण दिले. ती म्हणाली, आपण केवळ निवडणूक नव्हे, स्वातंत्र्य विरुद्ध शोषणाची लढाई लढत आहोत.
एरिक डोनाल्ड ट्रम्प यांचे मधले पुत्र. ट्रम्प कंपनीत उपाध्यक्ष आहेत. व्हाइट हाऊसमध्ये एरिकने देखील भाषण केले. प्रत्येक नागरिकावर गर्व आहे. भले त्याचा वर्ण कोणताही असो. माझे वडील वंशभेदाविरुद्ध लढत राहतील.

ज्युनियर ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात थोरले पुत्र. टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये ते झळकले होते. सध्या ते प्रचार मोहिमेचे प्रमुख प्रवक्ते आहेत. संमेलनात म्हणाले, ‘बायडेन जिंकल्यास देशाला अंधकारात ढकलतील.’