आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या जगभरात लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात लहान मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. पण, लवकरच लहान मुलांनाही लस मिळू शकते. कॅनडाने फायजरच्या व्हॅक्सीनला लहान मुलांना देण्यासाठी परवानगी दिली आहे. कॅनडाच्या ड्रग रेगुलेटर हेल्थ कॅनडाने 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी या लसीला परवानगी दिली आहे. यापूर्वी ही लस 16 पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना दिली जात होती. अमेरिकेतही फायजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTecch) च्या लसीला 12 ते 15 वर्षांच्या मुलांना देण्याची परवानगी लवकरच मिळू शकते.
जानेवारी ते मार्चदरम्यान फायजरच्या व्हॅक्सीनचे ट्रायल्स मुलांवर झाले होते. तेव्हा ही व्हॅक्सीन मुलांसाठी सुरक्षित असल्याचे कंपनीने सांगितले होते. ही लस 100% परिणामकारक सिद्ध झाली आहे. अमेरिकेत फायजरशिवाय मॉडर्ना आणि जॉनसन अँड जॉनसनच्या लसीचे मुलांवर ट्रायल्स केले जात आहेत. मॉडर्नाच्या लसीचे परिणाम जूनमध्ये येतील. तर, जॉनसन अँड जॉनसनच्या व्हॅक्सीनचे परिणा त्यानंतर येतील. म्हणजेच, या वर्षाच्या अखेरपर्यंत दोन्ही व्हॅक्सीन मुलांसाठी तयार होतील.
कॅनडामध्ये हेल्थ रेगुलेटरने स्पष्ट केले आहे की, सध्या 12 ते 15 वर्षांच्या मुलांना लस दिली जाईल. यापूर्वी, कंपनीने 13 एप्रिलला अमेरिकन ड्रग रेगुलेटर (US-FDA) कडून 12-15 वर्षांच्या मुलांना लस देण्याची परवानगी मागितली होती. अमेरिकन न्यूज चॅनल CNN च्या रिपोर्टनुसार, पुढच्या आठवड्यात अमेरिकेतही फायजरच्या लसीला लहान मुलांवर वापरासाठी मंजुरी मिळू शकते.
लहान मुलांवर किती परिणामकारक आहे फायजरची लस?
फायजरचा दावा आहे की, त्यांनी 12-15 वर्षांच्या 2,260 मुलांवर लसीचे परीक्षण केले. 31 मार्च 2021 च्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही लस या वयोगटातील मुलांवर 100% इफेक्टिव आहे. ट्रायल्समध्ये 18 मुलांना कोरोनाची लागण झाली होती, पण हे सर्व प्लेसिबो ग्रुपचे होते. आता या मुलांवर पुढील दोन वर्षे लक्ष्य ठेवले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.