आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्ग सुकर:कॅनडा तीन वर्षांत 15 लाख स्थलांतरितांना आश्रय देणार; भारतीयांना लाभाची शक्यता

ओटावाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाने तीन वर्षांत १५ लाख स्थलांतरितांना देशात आश्रय देण्याची योजना तयार केली आहे. कॅनडाचे मंत्री सिएन फ्रेसर म्हणाले, वर्क व्हिसा परमिट व इतर प्रक्रियांना आणखी जलद केले जाणार आहे. कॅनडा सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे भारतीयांना लाभ होण्याची शक्यता आहे. कॅनडातील लाेकसंख्येचे सरासरी वय व निवृत्तीचा निर्देशांक वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. कॅनडा सरकारच्या म्हणण्यानुसार त्यावर निर्णय झाला नाहीतर १० ते १५ वर्षानंतर देशाची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल. शाळा-रुग्णालयांना चालवणे देखील कठीण होईल. कॅनडातील प्रत्येकी पाचपैकी एक नागरिक इतर देशातून आलेला आहे, अशी माहिती गेल्या आठवड्यात जनगणना संस्थेने जाहीर केली. ६० टक्के लोक स्थलांतरितांबद्दल सकारात्मक वर्तन ठेवतात.

कॅनडात सध्या साडेअठरा लाख भारतीय, लोकसंख्येच्या ५ टक्के २०२१ च्या लोकसंख्येनुसार कॅनडात सुमारे साडे अठरा लाख भारतवंशीय लोक वास्तव्याला आहेत. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के आहे. बहुतांश भारतीय ओंटारियो व ब्रिटिश कोलम्बियात राहतात. गेल्या काही वर्षांत एलबर्टा व क्युबेकमध्येही भारतीयांची लोकसंख्या वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...