आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्करुग्णांवर नवी उपचार पद्धती शोधल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्यांनी कर्करोगावरील उपचारासाठी फोटो इम्युनोथेरपी शोधण्यात यश मिळवले. ही पद्धती मानवावर यशस्वी झाल्यास किमोथेरपी, रेडिओथेरपी, इम्युनोथेरपीनंतर कर्करोगावरील ही पाचवी उपचार पद्धती ठरेल. मागील थेरपीमध्ये राहून जाणाऱ्या लहान पेशींनादेखील नष्ट करण्याची क्षमता यात आहे. लंडनच्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटने उंदरांवर यशस्वी प्रयोग केला आहे. ग्लियोब्लास्टोमानेग्रस्त उंदरांवर हा प्रयोग करण्यात आला. ग्लियोब्लास्टोमा ब्रेन कॅन्सरमधील प्रकार आहे. त्याच्या उपचारात अगदी सूक्ष्म अशा पेशीही दिसून आल्या. डॉक्टरांनी त्यांना सहजपणे बाहेर काढले. काही पेशी उपचारानंतर नष्ट झाल्या. या उपचारानंतर रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती बळकट होऊ शकते, असा दावाही करण्यात आला आहे. रुग्णांत ग्लियोब्लास्टोमाची लक्षणे दिसताच त्याला पुन्हा नष्ट करता येईल. अभ्यासक डॉ. गॅब्रिएला क्रेमर-मरेकी म्हणाले, अशा पद्धतीचे उपचार गुंतागुंतीचे ठरतात. मेंदूत गाठ असल्याने असे उपचार आव्हानात्मक असतात. त्यामुळेच ट्यूमर सेलचा शोध लागणे हे ऐतिहासिक संशोधन ठरते. उंदरानंतर ग्लियोब्लास्टोमा पीडितांशिवाय माणसांवरदेखील उपचार केले जातील. यशस्वी झाल्यास कर्करोगावरील उपचार पद्धतीची पडताळणीचे इतर उपाय केले जातील.
उपचारात अतिशय सूक्ष्म पेशींची ओळख
थेरपीत कर्करोगाच्या लहान पेशी अंधारात चमकू लागतील. डॉक्टर त्यांना पाहून सहजपणे काढू शकतील. आतापर्यंतच्या थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशी शरीरात राहून जात होत्या. रुग्ण कमी वेळात दगावण्याची शक्यता असते. परंतु फोटो इम्युनोथेरपीमुळे रुग्ण दीर्घकाळ जीवन जगू शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.