आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:'हे तुला शक्य नाही...' या शब्दांनाच आव्हान मानून मी अंटार्क्टिकाला पोहोचले, हा प्रयत्न नव्या पिढीसाठी प्रेरक

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • द. ध्रुवावर स्वारी करणाऱ्या प्रीत चांदी यांचा प्रथमच माध्यमांशी संवाद

ब्रिटिश सेनेत भारतीय वंशाच्या कॅप्टन प्रीत चांदी ऊर्फ पोलर प्रीत दक्षिण ध्रुवावर एकट्या जाणाऱ्या पहिल्या बिगर श्वेत आणि जगातील तिसऱ्या महिला बनल्या आहेत. या प्रवासात त्यांनी अनेकदा हिमवादळ आणि उणे ४० ते ५० डिग्री तापमानाचा सामना केला. त्या ४५ दिवसांत हा प्रवास पूर्ण करणार होत्या, परंतु ४० दिवसांतच ११५० किमी अंतर एकटीने पार केले. सेनेत फिजिओथेरपिस्ट ३२ वर्षीय प्रीत यांनी या प्रवासातील अनुभव आणि भविष्यातील योजना भास्करच्या रितेश शुक्लसोबत शेअर केल्या. वाचा त्यांच्याच शब्दांत...

आता मी युनियन ग्लेशियरस्थित अंटार्क्टिका लॉजिस्टिक्स बेसवर आहे. घरी परतण्यासाठी हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहत आहे. आधी वाटत होते एकटेपणा त्रासदायक ठरेल. विश्वास ठेवा या ४० दिवसांत एवढे एकाकी वाटले नाही, जितके किशोरावस्थेत वाटत होते. मला दृढ विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही मनापासून काम करता तेव्हा एकाकी वाटत नाही. तुम्ही कम्फर्ट झाेनमधून बाहेर पडून काहीही मिळवू शकता. असे करणे मला लहानपणापासूनच आवडते. जे अशक्य वाटते ती सर्व कामे करण्याची इच्छा आहे, जी कामे तुला जमणार नाही असे लोक म्हणतात. मी नेहमीच ऐकत आले की मी हे करू शकत नाही, ते तुझ्याने होणार नाही. मला वाटते की लोक जेव्हा काही करण्यास मनाई करतात तेव्हा ते मुळात आपली भीती व्यक्त करत असतात. हे “नाही’ मी आव्हान म्हणून स्वीकारले आहे. जगात अंटार्टिकापेक्षा जास्त उंच, थंड, एकटी आणि शुष्क व बर्फाळ हवायुक्त दुसरे कोणतेच ठिकाण नाही. येथे एकटे ४० दिवस राहू शकतो. तेव्हा काहीही शक्यच आहे. या यशामुळे मी माझ्या ८ वर्षांच्या पुतणीचे रोल मॉडेल बनू शकते. माझी इच्छा आहे की, ती आणि येणारी पिढी अशक्याच्या सीमापासून पुढे जाव्यात आणि त्यांनी अनंत शक्यतांचा अनुभव घ्यावा.

साखरपुड्याच्या काही आठवड्यानंतरच मी या प्रवासासाठी निघाले होते. उणे ४५ ते ५० डिग्रीच्या थंडीत ताशी ६० किमी हवेच्या गतीच्या विरुद्ध ८७ किलो वजन घेऊन ९ ते ११ तास स्कीइंग करणे सर्वाधिक आव्हानात्मक राहिले. पडताना बचावणे, पडून उठणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हे थकवा आणणारे होेते. माझे शरीर तर रोजच थकत होते, पण आत्मा उत्साहाने ओथंबून राहत होता. प्रवासादरम्यान काही घेण्यासाठी माझ्या आजीने मला काही पैसे दिले होते. दक्षिण ध्रुवावर या पैशांचा वापर सर्वात मोठे आव्हान बनले. यादरम्यान मला समजले की बर्फाळ समुद्राप्रमाणेच उत्साह विस्तारला असून तो कधीच घटणार नव्हता. मी एक सैनिक असून संरक्षण करणे माझे काम आहे. या प्रवासानंतर कोणालाही माझ्या संरक्षण करण्याच्या पात्रतेवर संशय येणार नाही. माझा भाऊ माझ्याकडून राखी बांधून घेत होता. आता एका विश्वासासह तो मला राखी बांधू शकतो. दक्षिण ध्रुवाजवळ पृथ्वी आणि निसर्ग खूपच गंभीर दिसू लागतो. असे वाटते तो आपला त्रास उघड करू इच्छित नाही. परंतु आपल्याला सर्व माहिती आहे की निसर्गही पीडित आहे. या माहितीनंतरही संवेदनहीनता आपल्या सर्वांना महागात पडेल. येथून परतताच दुसऱ्या प्रवासाचा रोडमॅप तयार आहे. आता इच्छा आहे की दक्षिण ध्रुव ओलांडून दुसऱ्या टोकापर्यंत जाता यावे. असे आजवर कोणत्या महिलेने केलेले नाही. ही सर्व आव्हाने पार करण्याची शक्ती आणि प्रेरणा मला माझ्या आजोबांकडून मिळते. त्यांनी मला नेहमीच विश्वास दिला की मी मला वाटेल ते करू शकते. तथापि, आता ते या जगात नाहीत. परंतु या प्रवासात ते मला वरून बघत आहेत, असे वाटले.’ - प्रीत

बातम्या आणखी आहेत...