आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Carbon Dioxide Meter Made Mandatory Accessory Of School Children American Parents Giving Devices To Children

दिव्य मराठी विशेष:वर्गखोल्यांतील हवेत कोरोनाचा धोका किती हे तपासण्यासाठी मुलांना डिव्हाइस देताहेत अमेरिकी पालक, व्हेंटिलेशनमध्ये केली जातेय सुधारणा

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिलाडेल्फियाच्या लिजी रोथवेल यांनी मुलगा ल्यूकच्या प्राचार्यांकडे त्याला कॅफेटेरियाऐवजी बाहेर जेवण करू देण्याचा आग्रह धरला. त्यावर प्राचार्यांनी कारण विचारले असता रोथवेलने सांगितले की, कॅफेटेरियामध्ये कार्बन डायऑक्साइडचा (CO2) स्तर नियमित स्तरापेक्षा दुप्पट आहे. यावर प्राचार्य चकित झाले की हा डेटा त्यांच्याकडे कसा आला?

आर्किटेक्ट रोथवेल मुलाच्या दप्तरात काही दिवसांपासून पेन्सिल, स्टेशनरीसह लहान डिव्हाइस ‘कार्बन डायऑक्साइड मीटर’ही ठेवू लागल्या. हा डेटा याच डिव्हाइसद्वारे मिळाला आहे. अमेरिकेतील शाळा उघडल्यानंतर बहुतांश पालक मुलांच्या दप्तरात किंवा खिशात CO2 मीटर ठेवू लागले. त्याच्या मदतीने ते वर्गखोल्यांत पुरेशी ताजी हवा व तिच्या स्तराचा मागोवा घेत आहेत. CO2 चे कमी प्रमाण असल्यास खोली हवेशीर असते. यामुळे मुलांत संक्रमणाची शक्यता कमी असते. पालकांनी आता सोशल मीडियावर कम्युनिटी बनवली आहे. तेथे ते #CovidCo2 च्या माध्यमातून माहिती देऊ लागले की कसे डिव्हाइस लपवून पाठवले जावे. डेटाची माहिती शाळांना कळवण्याबाबतही सांगितले जात आहे. कोलोराडो बोल्डर विद्यापीठात एरोसोल सायंटिस्ट जोस जिमेनेजही मुलासोबत डिव्हाइस पाठवत असून ते हवेतील विषाणू ओळखून बीप देणे सुरू करते. जिमेनेज म्हणाले की, ७,५०० रुपयांच्या या डिव्हाइसद्वारे अचूक माहिती मिळवता येते. सेंट लुईच्या विज्ञान शिक्षिका जीन नॉरिस म्हणाल्या, त्यांच्या मुलीच्या वर्गखोलीतील CO2 चा स्तर १३०० पीपीएम हाेता. सीडीसीच्या शिफारशीनुसार तो ८०० पीपीएमच्या खाली राहिला पाहिजे. अरकन्सासच्या जेरेमी क्रिसलर यांना आढळले की त्यांच्या मुलांच्या वर्गातील CO2 स्तर ४००० पीपीएम होता. तपासात कळले की शाळेची एचव्हीएसी सिस्टिम व्यवस्थित काम करत नव्हती.

शाळांनी परवानगी दिली नाही तर खिशात लपवून नेताहेत डिव्हाइस
डेनवर विद्यापीठात एरोसोल शास्त्रज्ञ डॉ. एलेक्स हफमॅनही आपल्या मुलासोबत डिव्हाइस पाठवतात. त्यांनी सांगितले की, शाळा प्रशासनाची यावर हरकत असू शकते. परंतु याद्वारे व्हेंटिलेशनचा मुद्दा गांभीर्याने घेतला जात नसल्याचे आम्हाला कळून चुकले आहे. तिकडे अमेरिकेतील बहुतांश शाळा डिव्हाइसला परवानगी देत नाहीत. कॅलिफोर्नियात सेंटा क्रूज येथे राहणारे ग्राहम फ्रिमॅन यांच्या मुलांना डिव्हाइस घेऊन जाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कार्गो पँट खरेदी केल्या. ते आता खिशात डिव्हाइस लपवून शाळेत नेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...