आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅराइन जीन-पियरे व्हाइट हाऊसच्या नव्या प्रेस सचिव होतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. त्या 13 मे रोजी आपल्या पदाची सूत्रे स्विकारतील. सध्या त्या साकी यांच्या सहाय्यक म्हणून काम पाहतील.
कॅराइन जीन-पियरे व्हाईट हाऊसच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून सेवा देणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला व LGBTQ महिला ठरल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली घोषणा
बायडेन म्हणाले -कॅराइन जीन-पियरे व्हाइट हाऊसच्या नव्या प्रेस सचिव म्हणून काम करतील ही घोषणा करताना मला अभिमान वाटत आहे. त्यांच्याकडे केवळ या कठीण कामाचा अनुभव व प्रतिभाच नाही तर त्या अमेरिकन नागरिक व बायडेन-हॅरीस प्रशासनातील संवाद मजबूत करतील असा मला ठाम विश्वास आहे. ते म्हणाले, जिल (बायडेन यांच्या पत्नी) व मी अनेक दिवसांपासून त्यांना ओळखतो. त्यांचा आदर करतो. त्या माझ्या प्रशासनाचा बुलंद आवाज ठरतील.
कारकिर्दीवर एक नजर
44 वर्षीय जीन-पियरे सध्या व्हाईट हाऊसच्या उप प्रेस सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम केले आहे. याशिवाय त्यांनी 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रचार मोहीम व 2012 मध्ये बायडेन यांच्या प्रचार मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी लिबरल अॅडव्होकेसी ग्रुप MoveOn.org च्या मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्या NBC व MSNBC च्या राजकीय विश्लेषकही होत्या.
जेन साकी यांची घेणार जागा
जीन-पियरे व्हाईट हाऊसच्या मुख्य प्रेस सचिव जेन साकी यांची जागा घेतील. एका प्रेस ब्रीफिंगमध्ये साकी म्हणाल्या, पियरे ही भूमिका पार पाडणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला व LGBT समुदायाच्या पहिल्या महिला ठरतील. मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करणे हे त्या दाखवून देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.