आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हायरस:काेरोनामुळे व्यक्ती पुन्हा बाधित होण्याची शक्यता खूप कमी; तज्ज्ञांचे मत

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोगप्रतिकारशक्ती विकसित होणारच, आधीच्या अवशेषांमुळे तपासणीचे अहवाल चुकीचे शक्य

एखादी व्यक्ती काेरोना विषाणूमुळे पुन्हा बाधित होऊ शकते का? त्याचे शंभर टक्के उत्तर वैज्ञानिकांकडे अद्याप तरी नाही. परंतु बाधित होण्याची शक्यता जवळपास नाही. कारण कोरोना पीडित व्यक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची रोगप्रतिकार शक्ती विकसित होईलच, असे तज्ज्ञांना वाटते. परंतु या क्षमतेचा स्तर कसा राहील व तो किती काळ टिकू शकेल, हे त्यांना सांगता येणार नाही. अलीकडे काही प्रकरणांत पीडित बरे झाल्याच्या काही आठवड्याने त्यांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला. लोक समान आजाराने पीडित होत आहेत. आधीच्या बाधित असल्याच्या अवशेषांची माहिती त्यातून मिळत असल्याने अहवाल तसा येत असावा किंवा अहवाल चुकीचाही असू शकतो. त्यातूनच लोकांना ते पुन्हा बाधित झाल्याचे सांगितले जात असावे. बोस्टन कॉलेजमध्ये जागतिक जनआरोग्य कार्यक्रमाचे संचालक डॉ. फिलीप लांद्रिगन यांच्या मते, बरे झाल्यानंतर व्यक्ती पुन्हा बाधित होत असल्याचे काही पुरावे नाहीत.

तरुण डिस्टन्सिंग ठेवत नसल्याने पॉझिटिव्ह

जपानपासून अमेरिकेपर्यंतचे तरुण आता फिजिकल डिस्टन्सिंगचे भान ठेवत नसल्याचे दिसून येते. दुसऱ्या लाटेचे हे मोठे कारण ठरले आहे. दुसऱ्यांदा िनयम कडक लागू झाले असले तरी तरुण नियम पाळत नाहीत. कॅनबरामध्ये ऑस्ट्रेलियन नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी स्कूलचे प्रो. पीटर कॉलग्नन म्हणाले, २० ते ३० वयोगटातील लोकांवर मोठे संकट आहे. त्यांच्या वर्तनात बदल आणण्याची सर्वाधिक गरज आहे.

बेरोजगारी भत्ता करणार कमी :

ट्रम्प सरकार लवकरच बेरोजगारी भत्त्याच्या रकमेत सुमारे ४५ हजार रुपये घट करून तो १५ हजार रुपये करणार आहेत. सामान्य अमेरिकी नागरिकाचा एवढ्या पैशांत उदरनिर्वाह होणे कठीण असल्याचे डेमॉक्रॅटिक नेत्यांनी म्हटले आहे.