आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत चॉकलेट, कँडी, चिप्स, लॉलीपॉपसारख्या आकर्षक पॅकिंगमध्ये मिळणाऱ्या गांजाला ५ वर्षांहून लहान वयाची मुलेही बळी पडत आहेत. बहुतांश राज्यांत गांजा वापराला सूट दिल्यानंतर गेल्या चार वर्षांत अशा मुलांची संख्या १५ पट वाढली आहे. नॅशनल पॉइझन डेटा सिस्टिमच्या आकड्यांनुसार, २०१७ ते २०२१ च्या पाच वर्षांच्या अवधीत सहा वर्षांहून कमी वयाच्या ७ हजारांहून जास्त मुलांनी चुकून गांज्याचे चॉकलेट, कँडी खाल्ली. २०१७ मध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या २०० मुलांनी फसवणूक झाल्याने गांज्याच्या चॉकलेटचे सेवन केले होते. २०२१ मध्ये ३०५० मुलांनी अशी चूक केली. २०२० मध्ये उघड झाले की, विषारी पदार्थ खाण्याच्या सर्व प्रकरणांत ४० टक्के मुले गांजायुक्त पदार्थ खाण्याबाबतची होती. अभ्यासात पाच वर्षाच्या अवधीत सहापेक्षा जास्त वयाची ७००० मुलांनी कँडी, चॉकलेटमधून गांज्याचे चुकून सेवन केले.
१९ राज्यंात गंमत म्हणून गांजाच्या वापरास सवलत २०१७ मध्ये आठ राज्यांत मजा म्हणून गांजाचा वापर वैध केला. तेव्हा या घटना कमी होत्या. २०२२ मध्ये १९ राज्यांत गांज्याच्या अशा प्रकारच्या वापरास वैधता प्रदान केली. यामुळे विविध प्रकारची उत्पादने बाजारात आली. ही कायदेशीर मान्यता प्रौढांसाठी दिली. कायदेशीर मान्यता असणाऱ्या राज्यांत गांज्याचा वापर २० टक्क्यांहून जास्त आढळला. मात्र, प्रौढांच्या परवानगीत मुले बळी पडत आहेत. चुकून गांजा सेवनाच्या ९०% घटना घरी घडतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.