आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोषणा:चीनमध्ये घुसखोरी करणाऱ्यास पकडा अन् 54 हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

बीजिंग/मॉस्कोएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
छायाचित्र चीन-रशियाच्या सीमेवरील सुइफेन्हे शहरातील तात्पुरत्या रुग्णालयाचे आहे. वाढते बाधित लक्षात घेऊन येथे एका इमारतीचे केवळ ६ दिवसांत रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. - Divya Marathi
छायाचित्र चीन-रशियाच्या सीमेवरील सुइफेन्हे शहरातील तात्पुरत्या रुग्णालयाचे आहे. वाढते बाधित लक्षात घेऊन येथे एका इमारतीचे केवळ ६ दिवसांत रुग्णालयात रूपांतर करण्यात आले.
  • चीनमध्ये 24 तासांत नवे रुग्ण 1500 झाले, हेलोनजियांगमध्ये 300 रुग्ण

चीन-रशिया सीमेवरील सुइफिन्हे शहर कोरोनाचे नवे हॉटस्पाॅट होत आहे. रशियातून आलेले बहुतांशी जण येथे बाधित आढळले आहेत. शहरात २४ तासांत ५७ असे बाधित आढळले आहेत ज्यांच्यात कोणतेही लक्षण नव्हते. चीनमध्ये हवाई मार्ग बंद असला तरी रस्ते खुले आहेत. यामुळे या भागात राहणाऱ्यांना कसेही करून चीनमध्ये परत यायचे आहे. यामुळे सरकार चिंतेत आहे. अधिकाऱ्यांनी रशियातून हेलोनजियांगमध्ये अवैध पद्धतीने येणाऱ्यांची माहिती देणे व त्यांना पकडल्यास ५४ हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चीनमध्ये नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारपर्यंत १५०० झाली होती. एकट्या हेलोनजियांग प्रांतात नव्या प्रकरणांची संख्या वाढून ३०० च्या पुढे गेली आहे. यामुळे सुईफेन्हे येथे ६०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. ४ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचाही विचार सुरू आहे.

रशियात एक दिवसात ३३८८ रुग्ण

रशियात कोरोनाचे एका दिवसात विक्रमी ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची पुष्टी झाली आहे. यामुळे येथे रुग्णांची संख्या २५ हजारांच्या आसपास झाली आहे. देशातील कोरोना रिस्पॉन्स केंद्राच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ३३८८ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या आधी मंगळवारी येथे २७७४ नवे रुग्ण आढळले होते. तर, २२ जणांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रपती पुतीन यांनी संसर्ग रोखण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचे म्हटले होते.

वुहानमध्ये सर्व तात्पुरती रुग्णालये बंद, शेवटचे वैद्यकीय पथकही रवाना

चीनने देशातील सर्वात मोठे तात्पुरते रुग्णालय बुधवारी बंद केले. तेथे तैनात हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक परतले आहे. वुहानमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लीशेनशान रुग्णालय उभारले होते. तसेच, १४ तात्पुरती आरोग्य केंद्रेही बंद करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...