आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE Class 12 Board Exam Result | CBSE Class 12 Board Exam Result 2021, CBSE Class 12 Board Exam Result Date, CBSE Result, ICSE Result, Supreme Court

CBSE ने सांगितला 12वीच्या रिझल्टचा फॉर्मूला:13 सदस्यांच्या समितीने कोर्टात सादर केला अहवाल; 10वी, 11वी आणि 12वी प्री-बोर्डच्या आधारे ठरणार निकाल

12वी निकाल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो

CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल तयार करण्यासाठी बनलेल्या 13 सदस्यांच्या कमेटीने गुरुवारी सुप्रीम कोर्टात आपली रिपोर्ट सादर केली. यात बोर्डाने निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल, याबाबत माहिती दिली आहे. 12 वीचा निकाल 10वी, 11वीचा अंतिम निकाल आणि 12वीच्या प्री-बोर्डाच्या निकालावर ठरवला जाणर आहे. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास, 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

CBSE च्या कमेटीने पुढे सांगितले की, 10वीच्या 5 पैकी सर्वाधिक मार्क असलेल्या तीन विषयांना घेतले जाईल. तसेच, 11वीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12वी प्री-बोर्डाच्या प्रॅक्टिकलचे मार्ग ग्राह्य धरले जातील. 10वी आणि 11वीच्या गुणांना 30-30% आणि 12वीच्या गुणांना 40% वेटेज असेल. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांच्यासाठी नंतर वेगळी व्यवस्था केली जाईल.

30:30:40 फॉर्मूला
1. पॅनलच्या सदस्याने सांगितले की, आम्ही केंद्राच्या नवोदय विद्यालय, CBSE आणि इतर शाळांशी चर्चा केली. त्यातून समजले की, यंदाची बॅच पूर्णपणे ऑनलाइन होती.

2. अशा परिस्थितीत फक्त 12 वीच्या प्री बोर्डाच्या आधारे निकाल लावणे योग्य ठरणार नाही. त्यामुळेच 10वी आणि 11वीच्या गुणांचाही या निकालात समावेश करण्यात आला आहे.

3. कमेटी 12वीच्या गुणांना जास्त वेटेज देण्याच्या विचारात आहे. पण, सर्वांच्या विचारानंतर 10वी-11वीला 30-30% आणि 12वीला 40% वेटेज देण्यावर सहमती बनू शकते.

28 जूनपर्यंत डेटा पाठवावा लागेल

निकाल जाहीर करण्याचा फॉर्मुला आताच फायनल झाला आहे. आता निकालावर काम करणे सुरु होईल. 28 जूनपर्यंत हा डेटा शाळांना पाठवावा लागेल. सर्व डेटा आल्यानंतर सीबीएसई 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करू शकते.

बातम्या आणखी आहेत...