आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यटनस्थळ दुबई आता भारतीय सेलिब्रिटींसाठी बिझनेस हब बनत आहे. गेल्या ३ वर्षांत शाहरुख खान, विवेक ओबेरॉय व सानिया मिर्झाने व्यवसायासाठी दुबई गाठली आहे. भारतीय सेलिब्रिटी रिअल एस्टेट ते ज्वेलरी, हॉटेल, स्पोर्ट््स अकादमी आणि अॅक्टिंग स्कूल चालवत आहेत. दुबईत २०२३ दरम्यान भारतीयांची गुंतवणूक सुमारे ७ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे, तर २०२२ मध्ये ती ४.६७ लाख कोटी, २०२१ मध्ये ३.६९ कोटी रुपये होती. व्यवसायाकडे आकर्षित होण्याचे कारण म्हणजे येथे उपलब्ध कर सूट आणि दुबईच्या एकूण ९.३ दशलक्ष लोकसंख्येत सुमारे ३.८ दशलक्ष भारतीय राहतात.
शाहरुख खान : हाउसिंग व रिअल इस्टेटच्या व्यवसायात बॉलीवूड स्टार शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत दुबईत हाउसिंग आणि रिअल इस्टेट बिझनेस करत आहेत. सुमारे ६६ अब्ज रुपयांच्या त्यांच्या एका प्रोजेक्ट रॉयल इस्टेटमध्ये सध्या बांधकाम सुरू आहे. दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये २३ लाख चौरस फुटात हा प्रकल्प विकसित होत आहे.
विवेक ओबेरॉय : एज्युकेशन स्टार्टअप व ज्वेलरी शोरूम विवेक ओबेराय दुबईत ब्रिक्स अँड वूड नावाच्या कंपनीसोबत भागीदारीत ८ रिअल इस्टेट प्रकल्पावर काम करत आहे. एज्युकेशन स्टार्टअप आयस्कॉलरही लाँच केले आहे. याचा फायदा यूएईमधील भारतीय विद्यार्थ्यांनाही होणार आहे.ते येथे लॅब ग्रोवन डायमंड ज्वेलरीचे ५ शोरूम उघडतील.
सानिया मिर्झा : दोन टेनिस अकादमींमध्ये गुंतवणूक नुकतीच टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानिया मिर्झाने आता दुबईतील अल मनखूल आणि जुमेराह लेक टाॅवर्समध्ये दोन टेनिस केंद्रे सुरू केली आहेत. भारतानंतर दुबई हे माझे दुसरे घर असल्याचे सानिया म्हणते. मला टेनिसला दुबईत लोकप्रिय बनवायचे आहे, असे सानिया म्हणाली.
यांचाही दुबईत व्यवसाय अभिनेत्री प्रीती झंगियानी दुबईत आर्म्स रेसलिंगच्या प्रो पंजा लीगला सुरुवात करत आहे. राखी सावंतने दुबईत अॅक्टिंग स्कूल सुरू केले. संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तनेही आपला व्यवसाय दुबईला नेला आहे. पार्श्वगायिका आशा भोसले यांची येथे रेस्टॉरंट साखळी आहे. सुष्मिता सेनचे दुबई मॉल व वाफी सिटी मॉलमध्ये ज्वेलरी शोरूम आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.