आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Chairman Of Samsung Lee Kun Pass Awar At 78 Year, Global Brand Created The Company In A Span Of 30 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:अमेरिकेत आपले प्रॉडक्ट धूळ खात पडलेले पाहून संतप्त झाले होते सॅमसंगचे चेअरमन, स्वस्त टच स्क्रीनद्वारे नोकियाला संपवले...22 लाख कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले

साेही किम/सॅम किम | सेऊलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅमसंगचे चेअरमन 78 वर्षीय ली कुन यांचे निधन, 30 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीला बनवले ग्लोबल ब्रँड

जगात सर्वाधिक स्मार्टफोन, टीव्ही व मेमरी चिप तयार करणाऱ्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली कुन ही (७८) यांचे रविवारी निधन झाले. २०१४ मध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते बिछान्यावरच होते. १९३८ मध्ये वडिलांनी स्थापन केलेली कंपनी ३० वर्षांत ली कुन यांनी ग्लोबल ब्रँड म्हणून उभी केली. ८० देशांत ५ लाखांवर कर्मचारी आणि ६२ सहयोगी कंपन्यांसह २२.५ लाख कोटी रुपयांचे साम्राज्य आता त्यांचे चिरंजीव जे वाय ली सांभाळतील. ते सध्या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. आज ही जगातील बेस्ट इंटरब्रँड कंपन्यांच्या यादीतील अॅपल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या चार अमेरिकी कंपन्यांनंतरची पाच‌‌व्या क्रमांकाची कंपनी आहे.

सॅमसंगची ग्लोबल ब्रँड होण्याची कथा खूप रंजक आहे. ली कुन कंपनीला जीई, पीअँडजी आणि आयबीएमसारखी वर्ल्ड प्लेअर बनवू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी आपल्या टॉप लिडरशिपला २००० पर्यंतची डेडलाइन दिली होती. कंपनीचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी ते १९९९ मध्ये जागतिक दौऱ्यावर निघाले होते. फेब्रुवारीत कॅलिफोर्नियाच्या एका स्टोअरमध्ये त्यांना असे दिसले की, सोनी आणि पॅनॉसॉनिकचे टीव्ही सेट फ्रंट विंडोत होते तर सॅमसंगचा टीव्ही मागे खाली एका शेल्फवर धूळ खात होता. त्यामुळे ते संतप्त झाले. जूनअखेरीस ते जर्मनीत आले तेव्हा तेथे जगभरातील एक्झिक्युटिव्हजची बैठक बोलावली. सर्वांचे सल्ले ऐकून घेतल्यानंतर कुन यांनी ७ जून रोजी त्यांनी भाष्य सुरू केले. तीन दिवस ते सुरू होते. सलग बोलल्यानंतर ते सायंकाळी विश्रांती घेत, जेणेकरून एक्झिक्युटिव्हज विश्रांती घेऊ शकतील. त्यांच्या भाषणात अखेरचे शब्द होते... ‘आपली मुले, पत्नी सोडून सारे काही बदलून टाका. डिझाइन-तंत्रज्ञान सर्व... मला असा नवोत्कर्ष हवा आहे, जो जग कायम लक्षात ठेवेल.’ हा एक “फ्रँकफर्ट जाहीरनामाच’ होता. यानंतर सॅमसंग मोबाइल व टीव्हीत क्रांतिकारी बदल झाले. १९९५ मध्ये ही कंपनी अव्वल ठरली. अॅपलनंतर टच स्क्रीन स्वस्तात उपलब्ध करून देत या क्रांतीने नोकियासारख्या कंपनीला संपवले. १९९५ मध्ये कंपनीचा महसूल २४ हजार कोटी होता. तो आज शंभर पटीने वाढला आहे. कुन यांची काही भाषणे कायम स्मरणात राहावीत म्हणून फ्रँकफर्टच्या “त्या’ हॉलमधील वस्तू कंपनीने खरेदी करून मुख्यालयात एका हॉलमध्ये अगदी तशाच ठेवल्या आहेत. यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी आणि इच्छाशक्तीने त्यांनी जग बदलावे, हा यामागे उद्देश आहे. अॅपलच्या मेमरी चिप, रेटिना डिस्प्ले सॅमसंगच तयार करते. शिवाय, जगातील तेव्हाची सर्वात उंच बुर्ज खलिफा ही इमारतही सॅमसंगनेच उभी केली होती. याशिवाय जहाजबांधणी, विमा, बांधकाम, हॉटेल अशा अनेक क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. ली कुन यांच्यामुळेच द. कोरिया आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली.