आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्सच्या या गावाला समुद्र गिळंकृत करणार:सागरी सीमेवर 15 फूट तटबंदी उभारून सागरी अतिक्रमणाला आव्हान

वेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेट ब्रिटनमधील वेल्स या देशातील फेअरबोर्न गाव ३२ वर्षांत समुद्रात गडप होऊन जाईल. हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सुमारे ७०० लोकसंख्येच्या गावातील लोकांना सरकारने आठ वर्षांपूर्वी इशारा देऊन गाव सोडण्याचे आवाहन केले होते. परंतु गावकऱ्यांना गाव सोडण्याची मुळीच इच्छा नाही. त्यांनी सरकारी मदत व आपल्या पातळीवर निधी उभारून गाव व सागरी सीमेदरम्यान सुमारे १५ फूट उंच भिंत उभारून समुद्राच्या अतिक्रमणाला जणू आव्हानच दिले आहे. सागरी अतिक्रमणासाठी २०५४ पर्यंतचा इशारा आहे. सरकारने आणखी सहकार्य करावे.

नेदरलँड मॉडेल : सागरी पाणीपातळी वाढल्याने जमिनीला वाचवण्याच्या क्षेत्रात नेदरलँड मॉडेल प्रसिद्ध आहे. त्यात सागरकिनारी वाळू टाकून जमिनीचा स्तर वाढवला जातो. सुरक्षा भिंतही उभारली जाते.

बातम्या आणखी आहेत...