आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Chance To Win Gold Coin, Mixer, Scooter After Getting Vaccinated In Kovalam, Chennai; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:चेन्नईच्या कोवलममध्ये लस घेतल्यावर सोन्याचे नाणे, मिक्सर, स्कूटर जिंकण्याची संधी... माेफत बिर्याणी, मोबाइल रिचार्जही

चेन्नई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योजनेपूर्वी 50 लसीकरण, 1 आठवड्यात 650 जणांनी घेतली लस; 750 प्रतीक्षेत

तामिळनाडूत मोफत भेटवस्तू देणे शासकीय योजना व निवडणुकीचा भाग असतो. आता लसीकरण मोहिमेसाठी मोफत भेटवस्तूंचा आधार घेतला जात आहे. कोवलममध्ये लस घेणाऱ्यांना एनजीओच्या वतीने बिर्याणी व रिचार्ज कूपन देण्यात येत आहेत. तसेच साप्ताहिक लकी ड्रॉमध्ये बंपर बक्षीस देण्यात येत आहे. लकी ड्रॉ विजेते सोन्याचे नाणे, मिक्सर, ग्राइंडर, स्कूटर, वॉशिंग मशीन जिंकू शकतात. मच्छीमारबहुल कोवलमची लोकसंख्या १४ हजार ३०० आहे. यात १८ वर्षापेक्षा जास्त वयाचे ६४०० जण आहेत.

संस्थेचे म्हणणे आहे की, या योजनेमुळे लाेकांना लस घेण्याची प्रेरणा मिळत आहे. लसीकरणास सुरुवात होऊन अनेक दिवस उलटले असले तरी या आधी फक्त ५०-६० जणांनीच लस घेतली होती. या योजनेमुळे लोकांमध्ये उत्साह आहे. एका आठवड्यात ६५० पेक्षा जास्त लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच ७५० पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, लसीबाबत आमच्यात मनात संशय होता. मात्र, टीमच्या प्रयत्नांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले. आता पूर्ण कुटुंबासह लस घेत आहोत.

कोवलमला कोरोनामुक्त करण्याची ही मोहीम एसटीएस फाउंडेशन, सीएन रामदास ट्रस्ट आणि न्यूयॉर्कची संस्था चिरागने सुरू केली आहे. सीएन रामदास ट्रस्टमध्ये डॉन बाॅस्को स्कूलचे १९९२ बॅचचे माजी विद्यार्थी आहेत आणि न्यूयॉर्कमधील संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. राजीव फर्नांडो यांनी चिरागची स्थापना केली आहे. हे दोन्ही ट्रस्ट निधी जमवतात आणि एसटीएस फाउंडेशन प्रत्यक्ष काम करते.

एसटीएस फाउंडेशनचे विश्वस्त सुंदर सांगतात, टोल फ्री क्रमांकावर फोन करून लोक त्यांची वेळ निश्चित करू शकतात. लसीच्या उपलब्धतेच्या आधारे आम्ही स्लॉट देत आहोत. मोफत बिर्याणीचे लोकांना आकर्षण आहे आणि आमच्या केंद्रातील वातावरण रुग्णालयापेक्षा जास्त मजेशीर आहे. कोवलममध्ये १००% वयस्करांचे लवकरात लवकर लसीकरण करून हे गाव देशात रोल मॉडेल करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

पहिला प्रकल्प यशस्वी, आता दुसऱ्या गावांत ही योजना राबवणार
मोहिमेआधी ५०-६० जणांनीच लस घेतली होती. मात्र एका आठवड्यातच ६५० पेक्षा जास्त जणांनी पहिला डोस घेतला आहे व ७५० स्लॉट बुक झाले आहेत. प्रकल्पाच्या यशामुळे इतर गावांत योजना राबवण्याची प्रेरणा मिळाली आहे,असे सीएन रामदास सीडी ट्रस्टचे गिरीश यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...