आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन प्रकरण:आदेश देणाऱ्या गव्हर्नरला हटवा, ट्रम्प यांचे ट्विट; डेमाेक्रॅट‌्सच्या नेत्यांवर राष्ट्राध्यक्ष संतापले

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • इडाहाे : ट्रम्प यांच्या पक्षांचा गव्हर्नरच्या विराेधातील आंदोलनास पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प लाॅकडाऊनच्या बाजूने दिसत नाहीत. कारण लाॅकडाऊनचे आदेश देऊन लाेकांना घरातच राहण्याचे आदेश देणाऱ्या विविध प्रांतांच्या राज्यपालांवर ते भडकले आहेत. अशा गव्हर्नरला हटवण्यात यावे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी ट्विट करून भावना जाहीर केल्या आहेत. ट्विटमध्ये ट्रम्प म्हणाले, ‘लिबरेट मिनिसाेटा, लिबरेट मिशिगन, लिबरेट व्हर्जिनिया.’ या सर्व राज्यांत खरे तर डेमाेक्रॅटिक पार्टीचे गव्हर्नर आहेत. या राज्यपालांनी राज्यात लाॅकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविराेधात सर्व राज्यांत निदर्शने केली जात आहेत. निदर्शकही आपल्या घाेषणांत लिबरेट शब्दाचा वापर करू लागले आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांनी देखील ट्विटमध्ये या शब्दाचा वापर केला. ट्रम्प यांनी ट्विटमधून न्यूयाॅर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमाे यांच्यावरही टीका केली. क्यूमाे यांना काम करण्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. त्यांनी तक्रार करण्यात वेळ घालवू नये, असा टाेला त्यांनी लगावला. तत्पूर्वी, ट्रम्प सरकार अयशस्वी ठरले आहे, अशी टीका क्यूमाे यांनी केली हाेती.

इडाहाे : ट्रम्प यांच्या पक्षांचा गव्हर्नरच्या विराेधातील आंदोलनास पाठिंबा  

अमेरिकेतील इडाहाे राज्याची राजधानी बाेईसमधील हे छायाचित्र आहे. येथे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची सत्ता आहे. परंतु, गव्हर्नर ब्रॅड लिटल्सने लाेकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याविराेधात लाेक निदर्शने करू लागली आहेत. या लाेकांनी आंदाेलनाला स्टँड फाॅर हाेम असे नाव दिले आहे. 

व्हर्जिनिया : बालसुधारगृहात २५ मुले बाधित, कर्मचाऱ्यांमुळे संसर्ग

अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्याच्या बाेन एअर बाल सुधारगृह काेराेनाचा नवा हाॅटस्पाॅट बनले आहे. येथे २५ मुले बाधित आढळून आले आहेत. देशभरातील बालसुधारगृहातील सर्व मुले बाधित आढळून आले आहेत. मुलांना सुरक्षित काढण्याचे आवाहन एनजीआे यूथ फर्स्ट इनिशिएटिव्हचे प्रमुख लिज रयान यांनी गव्हर्नर राल्फ नाॅर्थम यांच्याकडे केली आहे. त्यांनी दाेन आठवड्यांपूर्वी याबाबत इशारा दिला हाेता. कारण सुधारगृहातील दाेन कर्मचारी बाधित आढळून आले हाेते. 

अमेरिका :  मृत्युमुखी पडलेल्यांत प्रत्येकी ५ व्यक्ती आराेग्य कर्मचारी

अमेरिकेत सहा आठवड्यांपूर्वी काेराेनामुळे पहिल्या आराेग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला हाेता. तेव्हापासून आतापर्यंत ७ हजार आराेग्य कर्मचारी दगावले आहेत. त्यात डाॅक्टर व परिचारिकांचा समावेश आहे. देशात काेराेनामुळे आतापर्यंत ३७ हजारांहून जास्त लाेकांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच अमेरिकेत काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांत प्रत्येकी पाचवा आराेग्य कर्मचारी आहे. न्यूयाॅर्क, फ्लाेरिडा, नेवाडा, मॅने, मॅसाच्युसेट्स, इत्यादी ठिकाणी हे घडले.

बातम्या आणखी आहेत...